साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
मिग्युअल एंजल ऑस्टुरिअस
Miguel Angle Asturias
जन्म : 19 ऑक्टोबर 1899
मृत्यू: 9 जून 1974
राष्ट्रीयत्व : ग्वाटेमाला
पुरस्कार वर्ष: 1967
मिग्युअल एंजल ऑस्टुरिअस लॅटिन अमेरिकन देश ग्वाटेमालाचे सुप्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार होते. लॅटिन अमेरिकन देशातील हुकुमशहांनी कित्येक वेळा लोकशाहीचा बीमोड करण्याचा प्रयत्न केला होता. ऑस्टुरिअस हे नेहमी हुकुमशहांच्या विरुद्ध लेखन करत असत. ‘द प्रेसिडेंट’, ‘द मॅन ऑफ कॉर्न’, ‘स्ट्राँगविंड’, ‘ग्रीन पोप’ इत्यादी त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत.