साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
पाब्लो नेरुदा
Pablo Neruda
जन्म : 12 जुलै 1904
मृत्यू : 23 सप्टेंबर 1973
राष्ट्रीयत्व : चिली
पुरस्कार वर्ष: 1971
पाब्लो नेरूडा या चिली कवीने आपल्या घरातील फर्निचर, घड्याळ विकून पुस्तक छापले. त्यानंतर त्यांना प्रकाशक मिळाला. त्यांनी अनेक देशांत चिलीचे राजदूत म्हणून काम केले. त्यांची ‘रेजिडन्स ऑन अर्थ एंड ऑदर पोएम्स’, ‘द मॅन हू टोल्ड हिज लव्ह’, ‘सिलेक्टेड पोएम्स’ इत्यादी कवितासंग्रह खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या या काव्यलेखनाबद्दल त्यांना 1971 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला.