Mindfulness Meditation:माइंडफुलनेस ध्यान म्हणजे काय ? ते कसे करावे ?त्याचे मानसिक आणि शारीरिक फायदे

माइंडफुलनेस ध्यान म्हणजे काय?

माइंडफुलनेस मेडिटेशन (Mindfulness Meditation) ही एक ध्यानाची पद्धत आहे, ज्यात आपले संपूर्ण लक्ष आपल्या वर्तमान क्षणी केंद्रित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजे “आता आणि इथे” या क्षणात राहणे. वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा हा प्रकार आहे. यात आपल्या विचारांवर, भावना, श्वासोच्छवास, आणि शरीरातील संवेदनांवर लक्ष केंद्रित केले जाते, या ध्यानाचा उद्देश मन रिकामे करणे नसून, येणाऱ्या प्रत्येक अनुभवाची जागरूकता वाढवणे आहे.

ध्यान कसे करावे :

स्थिर स्थितीत बसणे: शांत जागा निवडा. आरामदायक स्थितीत बसावे. पाठ सरळ ठेवा आणि हात पाय आरामदायक स्थितीत ठेवा.
श्वासावर लक्ष केंद्रित करणे: तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास घेताना आणि सोडताना त्याची संवेदना जाणून घ्या.
विचारांवर निरीक्षण करणे: जरी विचार येत असले तरी त्यांना नकारात्मक दृष्टिकोनाने पाहू नका. त्यांना फक्त निरीक्षण करा आणि त्यांना जाऊ द्या.विचार विचलित झाले तरी त्यांना परत श्वासाकडे वळवा.
वर्तमान क्षणात राहणे: तुमच्या मनाच्या आणि शरीराच्या स्थितीवर लक्ष ठेवा, आणि वर्तमान क्षणात उपस्थित रहा. यामध्ये आपल्याला भूतकाळ किंवा भविष्य यामध्ये गुंतून न राहता वर्तमान क्षणात असणे आवश्यक आहे.

माइंडफुलनेस ध्यानाचे फायदे: 

a. मानसिक आरोग्यासाठी फायदे: ताणतणाव कमी होतो. एकाग्रता, लक्ष, आणि निर्णयक्षमता सुधारते. चिंता, ताण, आणि मानसिक थकवा कमी होतो

b. शारीरिक आरोग्यासाठी फायदे: रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. हृदयविकाराचे धोके कमी होतात.

c. भावनिक आणि सामाजिक फायदे: संबंध सुधारतात, कारण संयम आणि समज वाढते. कठीण प्रसंगांमध्ये भावनिक प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवता येते. मनोविकार आणि चिडचिड कमी होतो.

माइंडफुलनेस मेडिटेशनचा नियमित सराव कसा करावा?

दररोज किमान ५ ते १० मिनिटे ध्यान करण्याचा प्रयत्न करा.सुरवातीला सोप्या साधनांपासून सुरू करा, नंतर हळूहळू वेळ वाढवा.
आपल्यासाठी शांत आणि आरामदायक वातावरण शोधा.श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि जर विचार येत असतील,तर त्यांना सोडून द्या.

माइंडफुलनेस मेडिटेशनसाठी टिप्स:

आपल्या ध्यानात काही अपेक्षा ठेवणे आवश्यक नाही.वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करा.फक्त वर्तमान क्षणाचा अनुभव घ्या.
सुरुवातीला आपणास ध्यानास कंटाळा येऊ शकतो, परंतु नियमित सरावामुळे त्याचे फायदे दिसू लागतात.

Leave a comment