1 योग अभ्यास समजून घेऊन त्याचा विकास करणे, त्याचा आपल्या जीवनाशी समन्वय साधने हे योग अभ्यासाचे पहिले उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टानुसार योगाच्या अभ्यासाचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर त्याचा आपल्या जीवनाशी समन्वय साधता आला पाहिजे.
2 स्वतःमध्ये आणि मुलांमध्ये निरोगी सवयी लावणे निरोगी जीवनशैली विकसित करणे. या उद्दिष्टानुसार आपल्याला आणि मुलांना निरोगी सवयी लावल्या पाहिजेत. आहार विहार, आचार आणि विचार यांत चांगल्या गुणांचा, चांगल्या गोष्टींचा अंगिकार केला पाहिजे.
3 योग सामर्थ्याने मानवी मूल्यांचा विकास करणे. सर्वांनी एकमेकाशी सौजन्याने, समतेने, निर्मळमनाने वागले पाहिजे.
4 योग सामर्थ्याने शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य विकसित झाले पाहिजे, केवळ शरीर तंदुरुस्त करणे किंवा ठेवणे हा योगाचा हेतू नाही, तर त्या बरोबर मानसिक विकास झाला पाहिजे. आपल्या मनात नेहमी शुद्ध आणि निर्मळ विचार आले पाहिजेत. आपल्या भावना संतुलित हव्यात.