साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
आयझॅक बी. सिंगर
Isaac B. Singer
जन्म : 14 जुलै 1904
मृत्यू : 24 जुलै 1991
राष्ट्रीयत्व : पोलिश/अमेरिकन
पुरस्कार वर्ष: 1978
आयझॅक सिंगर यांचा जन्म पोलंडला झाला. ते अमेरिकेला जाऊन स्थायिक झाले. ते यहुदी असल्यामुळे त्यांनी आपले लेखन यिड्डिश भाषेत लिहिले. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचे इंग्रजी आणि जपानी भाषेत अनुवाद झाले आहेत. ‘द फॅमिली मस्कट’, ‘द मॅजिशियन’, ‘द स्लेव्ह’, ‘द मॅनेट’, ‘द इस्टेट’ इत्यादी त्यांची पुस्तके खूप लोकप्रिय आहेत.