महाराष्ट्राचा इतिहास: History of Maharashtra

शहाजीराजे भोसले (इ.स. 1594 ते इ. 1664):

मालोजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र शहाजीराजे भोसले हे पराक्रमी व कर्तबगार राजे होते. त्यांनी अहमदनगरचा निजामशाहा, विजापूरचा आदिलशाहा यांच्याकडे घेत परिस्थितीनुसार सरदारकी केली. ते काही काळ मोगलांच्या सेवेत होते. शहाजीराजे यांच्याकडे पुणे, सुपे, चाकण, बंगळूर, वेलोर या प्रदेशांची सुभेदारी होती.

शहाजीराजे यांनी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना ते शक्य झाले नाही. पुत्र शिवाजीराजे व संभाजीराजे यांना युद्धकलेचे व संस्कृत भाषेचे घडे दिले. जिजाबाई आणि शहाजीराजे यांनी स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा दिली. जिजामातांनी स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात अखेरपर्यंत साथ दिली, त्यांच्या प्रेरणेतूनच शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले.

छत्रपती शिवाजी महाराज (इ स 1630 ते इ स. 1680):

जन्म: 19 फेब्रुवारी 1630

जन्मस्थळ: शिवनेरी किल्ला (जि. पुणे)

माता : जिजाबाई

वडील : शहाजीराजे

पत्नी: सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई,काशीबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई.

कन्या: सुभुबाई, राणुबाई, अंबिकाबाई, बालाबाई (दीपा), कमलजाबाई, नानीबाई

शिवाजी महाराजांची कारकीर्द :

स्वराज्य स्थापना : शिवरायांनी पुण्याजवळील भोर तालुक्यातील रायरेश्वराच्या मंदिरात 1646 साली वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची शपथ ठेव घेतली.

* स्वराज्याचे तोरण बांधले 1646 साली शिवरायांनी तोरणा किल्ला

आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले.

• पुरंदर किल्ला ताब्यात :

1649 साली शिवरायांनी विजापूरचा सरदार फत्तेखान याचा पराभव करून पुरंदर ताब्यात घेतला. तेव्हापासून आदिलशाही आणि शिवराय यांच्यात शत्रुत्व वाढत गेले.

* जावळी ताब्यात :

जावळी प्रांत अत्यंत दुर्गम आणि सुरक्षित होता. जावळीवर विजापूरच्या आदिलशाहाने नेमलेल्या चंद्रराव मोऱ्यांची सत्ता होती. चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांना ‘राजे’ मानण्यास तयार नव्हते. शिवरायांनी चंद्रराव मोऱ्यांचे पारिपत्य करून त्याला ठार मारले व जावळी स्वराज्यात सामील करून घेतली. ही घटना 1656 साली घडली.

• अफजलखानाचा वध

पुरंदर पाठोपाठ चंद्रराव मोऱ्यांचा वध करून:

शिवरायांनी स्वराज्याची घोडदौड चालू ठेवली होती. त्यामुळे विजापूरची आदिलशाही शिवरायांवर चिडली होती. त्यांनी शिवरायांना ठार मारण्याच्या उद्देशाने मोठ्या फौजेनिशी अफजलखानाला पाठवले. शिवरायांनी अफजलखानाला भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून घेतले. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर तर शिवरायांचा वकील पंताजी गोपीनाथ होता.

उभयतांत ठरल्याप्रमाणे 16 नोव्हेंबर 1659 रोजी भेट झाली. भेटीत खानाने दगाफटका केल्यावर शिवरायांनी अफजलखानाचा वध केला. त्या वेळी सय्यद बंडा हा खानाचा अंगरक्षक होता, तर जिवा महाला हा शिवरायांचा अंगरक्षक होता.

• रुस्तुमेजमानाचा पराभव:

अफजलखानाच्या वधानंतर रुस्तुमेजमान हा विजापूरचा सरदार शिवरायांवर चालून आला. शिवाजी महाराजांनी कोल्हापूरच्या वाटेवर उघड्या मैदानावर 28 डिसेंबर 1659 रोजी त्याचा पराभव केला.

• पन्हाळगडाला वेढा व सुटका:

अफजलखानाचा वध आणि रुस्तुमेजमानाचा पराभव या घटनांमुळे विजापूरचा आदिलशाही दरबार खवळला होता. शिवाजी महाराज पन्हाळगडावर असताना विजापूरचा सरदार सिद्दी जौहर आणि अफजलखानाचा मुलगा फाजलखान यांनी मोठ्या फौजेनिशी पन्हाळगडाला वेढा दिला.

शिवाजी महाराजांनी सिद्दी जौहारला भेटीला येतो असे सांगून वेढा गाफील ठेवला. भेटीसाठी शिवाजी महाराजांसारखा हुबेहूब दिसणाऱ्या शिवा काशीदला पाठवले आणि महाराज बाजीप्रभूसह विशाळगडला निघाले.

वाटेत शत्रुसैन्याने गाठले. बाजीप्रभूनी खिंड अडवली. या धुमश्चक्रीत बाजीप्रभू आणि शिवा काशीद यांना स्वराज्यासाठी बलिदान द्यावे लागते.

ही घटना 1660 साली घडली.

• शायिस्तेखानावर हल्ला:

शिवरायांचे वाढते बळ लक्षात घेऊन मोगल सरदार शायिस्तेखान शिवरायांवर चालून आला. शायिस्तेखान 1660 ते 1663 या काळात महाराष्ट्रात होता. त्याने पुण्यात लाल महालात तळ ठोकला होता. शायिस्तेनाखाचा मातब्बर सरदार कारतलबखान याचा पराभव करून शिवरायांनी एक दिवस अचानक लाल महालावर छापा टाकला. या हल्ल्यात खान वाचला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची वैशिष्ट्ये :

* स्वराज्यांतर्गत ब्राह्मणांचा विरोध डावलून शिवरायांनी राज्याभिषेक केला.

* शिवरायांनी राज्याभिषेकासाठी रायगड हे अत्यंत दुर्गम आणि सुरक्षित स्थान निवडले.

रायगड किल्ल्याचे बांधकाम हिरोजी इंदूलकर या शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत सेवकाच्या देखरेखीखाली पूर्ण झाले.

राज्याभिषेकाचे पौरोहित्य काशीहून आलेल्या गागाभट्टाने केले.

राज्याभिषेक प्रसंगी राजमाता जिजाबाई, संभाजीराजे, अष्टप्रधान मंडळ, महाराणी सोयराबाई, इंग्रज वकील हेन्री ऑक्झिांडन इत्यादी प्रमुख मंडळी उपस्थित उते. शिवराज्याभिषेकापासून ‘शिवशके’ ही नवी कालगणना शिवरायांनी सुरू केली.

स्वराज्याचा ध्वज भगवा होता.

शिवराज्याभिषेकाला 1674 साली 50 लाख रुपये खर्च आला होता. राज्यकारभाराच्या सोयीसाठी शिवरायांनी राजव्यवहारकोषाची निर्मिती

शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ:

शिवरायांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केती. हे अष्टप्रधान मंडळ आदर्श मंत्रिमंडळ म्हणून आजही प्रसिद्ध आहे.

शिवरायांची कर्नाटक मोहीम व दक्षिण दिग्विजय

• छत्रपती शिवाजी महाराज व कुतुबशाहा भेट:

छत्रपती शिवरायांनी ओळखले होते की, मोगलच आता खरे शत्रू उरले आहेत. आदिलशाही आणि निजामशाही खिळखिळी झाली आहेत. 1676 मध्ये शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहाची भेट घेतली. दोघांनी मिळून दक्षिणेतील पठाणांचा आणि मोगलांचा बीमोड करण्याचे ठरले. कुतुबशाहाने शिवाजी महाराजांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले व दोघांच्यात तह झाला.

• जिंजी जिंकली :

मद्रासच्या (चेन्नई) दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे. हा किल्ला रायगडाप्रमाणेच प्रचंड व मजबूत आहे. जिंजीला वेढा घालून महाराजांनी तो किल्ला जिंकला. त्यानंतर वेल्लूर, तिरुवाडी, वालदूर, कोलार, बाळापूर इत्यादी ठाणी जिंकून घेतली. कर्नाटक मोहिमेत शिवरायांनी वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि छोटे-मोठे किल्ले जिंकले.

• शिवराय-व्यंकोजी भेट:

दक्षिणेच्या मोहिमेवर असताना महाराजांनी त्यांचा सावत्रभाऊ व्यंकोजीला भेटीसाठी बोलावले. व्यंकोजी नाखुशीने भेटीला आला. स्वराज्याच्या कार्यात सहकार्य करण्यासाठी शिवरायांनी व्यंकोजीला गळ घातली, परंतु व्यंकोजी एका रात्री शिवरायांना न कळता तंजावरला निघून गेला. तरीही शिवरायांनी व्यंकोजीची दीपाबाई हिला शिवरायांनी साडी-चोळी पाठवली. जिंजीचा काही भाग दिला.

दक्षिणेच्या मोहिमेवरून शिवराय रायगडावर परत येताच त्यांना एक वाईट बातमी समजली. त्यांचा पुत्र संभाजी औरंगजेबाचा सेनापती दिलेरखानाला जाऊन मिळाला.

स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात शिवाजी महाराजांना परकीयांनी जितका त्रास दिला त्याहीपेक्षा अधिक स्वकीयांनी दिला असे म्हटले जाते.

शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रचना व व्यवस्था :

* स्वराज्याची रचना स्वराज्यातील प्रदेशाची विभागणी प्रांतांत करण्यात आली.

• प्रांत :

वाई, मावळ, पन्हाळा, ठाणे, दक्षिण कोकण, त्रिंबक, कोल्हापूर, बागलाण, बिदनूर, कर्नाटक, श्रीरंगपट्टण, वेलोर, तंजावर असे एकूण चौदा प्रांत स्वराज्यात होते. प्रांताच्या मुख्य अधिकाऱ्याला सुभेदार म्हणत. प्रांतांची विभागणी महाल किंवा तरफ यांत होई. दोन महालांचा एक प्रांत होई.

* प्रांतांतील अधिकारी : मुजुमदार, चिटणीस, दप्तरदार, फडणीस, सबनीस, पोतनीस.

* खेड्यातील अधिकारी: पाटील, कुलकर्णी.

छत्रपती शिवाजी महाराजांची सैन्य व्यवस्था :

(१) घोडदळ : 25 घोडेस्वारांच्या अधिकाऱ्याला ‘हविलदार’ म्हणत.

अशा पाच हविलदारांच्या अधिकाऱ्यास ‘जुमलेदार’ म्हणत. दहा जुमल्यांच्या अधिकाऱ्यास ‘हजारी’ म्हणत आणि पाच हजारीच्या वरच्या अधिकाऱ्यास ‘पंचअधिकारी’ म्हणत. घोडदळाच्या सेनापतीस ‘सरनोबत’ म्हणत. घोडदळात स्वतःचा घोडा व शस्त्रे बाळगणाऱ्यास ‘शिलेदार’ म्हणत.

(२) पायदळ : दहा सैनिकांचा अधिकारी म्हणजे नाईक. पाच नाईकांवर एक जुमलेदार. एक हजार सैनिकांच्या अधिकाऱ्यास ‘हजारी’ म्हणत. पायदळ प्रमुखास ‘सरनोबत’ म्हणत.

(३) नाविक दल : मध्ययुगात नाविक दल उभारणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. शिवरायांच्या नाविक दलात सुमारे 200 जहाजांचे आरमार होते. नौदल प्रमुखास ‘दर्यासारंग’ म्हणत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यातील किल्ले :

* छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात सुमारे 300 किल्ले होते.

* छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात सुमारे 70 जलदुर्ग होते.

* गडाच्या संरक्षण व्यवस्थेच्या प्रमुखास ‘हवालदार’ म्हणत.

* हवालदाराला रूढ भाषेत ‘किल्लेदार’ म्हणत.

गडावरील आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या अधिकाऱ्यास ‘सबनीस’ म्हणत.

* गडावरील बांधकाम, दुरुस्ती, धान्य कोठी इत्यादीच्या प्रमुखास ‘कारखानीस’ म्हणत.

छत्रपती शिवाजी महाराज : स्फूर्तीचा जिवंत झरा

• स्फूर्तिदाता :

छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. अशक्य ते शक्य करून दाखवले. त्यांचे चरित्र अनेक कठीण प्रसंगांनी भरलेले आहे. त्यांच्या महान चरित्रातून स्फूर्ती मिळते.

मातृ-पितृभक्ती :

शिवराय नेहमी जिजामातेच्या आज्ञेत राहिले. आईच्या इच्छा त्यांनी पूर्ण केल्या. एकदा त्यांना वडील शहाजीराजे भेटायला आले. त्यांना पालखीत बसवले आणि राजे स्वतः पालखी बरोबर चालू लागले. त्यांची मातृ-पितृभक्ती अतुलनीय अशी होती.

* सर्व धर्मांचा व साधुसंतांचा आदर:

सर्वच धर्माचे साधुसंत समाज- प्रबोधन करतात हे शिवराय ओळखून होते. शिवरायांनी परमानंद, गागाभट्ट, धुंडिराज, भूषण इत्यादी विद्वानांचा सत्कार केला. तसेच रामदास, तुकाराम, बाबा याकूत, मौनीबाबा इत्यादी संतांचा बहुमान केला. त्यांना मंदिरे प्रिय होती, परंतु त्यांनी मशिदी, चर्च यांचेही रक्षण केले. राज्यकारभार करताना हिंदू-मुस्लीम असा कधीच भेदभाव केला नाही.

‘सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे’ हा छत्रपती शिवाजी महाराजांचा बाणा होता.

* स्वदेशाभिमान :

छत्रपती शिवाजी महाराज एका जहागीरदाराचे पुत्र:

होते. त्यांना धन, दौलत कमी नव्हती; पण त्यांना गुलामगिरी नको होती. रयतेच्या यातना त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. आपल्या देशात आपले राज्य व्हावे ही त्यांची प्रेरणा होती. स्वदेश, स्वभाषा आणि स्वधर्माच्या उत्कर्षासाठी शिवराय आयुष्यभर झटले. त्यांना संस्कृतचे ज्ञान होते. तरी सुद्धा त्यांनी मराठी भाषेतून राजव्यवहारकोश बनवून घेतला.

* शिवरायांचे आठवावे रूप :

शिवरायांचे कर्तृत्व, धाडस, बाणेदारपणा, स्वदेशाभिमान, मुत्सद्दीपणा, हिकमतीपणा, लढवय्यापणा हा अद्वितीय असा होता.

* शिवरायांचे देहावसान :

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला.

Leave a comment