(मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध) :
छत्रपती संभाजी (1681 ते 1689) :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी संभाजीराजे सज्जनगडावर होते. गृहकलहामुळे आणि कारभाऱ्यांच्या जाचाला कंटाळून ते दिलेरखानाला मिळाले होते, परंतु दिलेरखानाचे मराठ्यांवरील अत्याचार पाहून ते पन्हाळगडावर आले. संभाजीराजे पन्हाळगडावर असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी सोयराबाईंनी आपला पुत्र राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला. ही बातमी संभाजीराजे यांना कळताच ते ताबडतोब रायगडावर गेले व विरोधकांचे पारिपत्य करून स्वतः स राज्याभिषेक करवून घेतला.
* छत्रपती होण्यापूर्वी संभाजीराजे काही काळ दिलेरखानाच्या आश्रयास होते.
* छत्रपती झाल्यानंतर औरंगजेबाचा पुत्र अकबर छत्रपती संभाजीराजेंच्या आश्रयास आला होता.
* अकबराने संभाजीराजेंचा आश्रय घेतला हे औरंगजेबाच्या दख्खनच्या मोहिमेचे एक महत्त्वाचे कारण होते.
* कवी कलश हा छत्रपती संभाजी महाराज यांचा विश्वासू सल्लागार आणि मित्र होता.
* सिद्दीच्या अमलाखालील जंजिरा किल्ला जिंकण्याचा छत्रपती संभाजीराजे यांनी प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही.
* गोव्याच्या स्वारीत बरेच यश संपादन केले होते; परंतु त्याच वेळी औरंगजेबाने महाराष्ट्रात कूच केली होती. त्यामुळे गोव्याची लढाई अर्ध्यावर सोडावी लागली होती.
* छत्रपती संभाजीराजेंनी आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक लढाया जिंकल्या.
* विजापूर, गोवळकोंडा जिंकून औरंगजेब महाराष्ट्रात आला होता.
* बेसावध असताना छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी मोगल सरदार मुकर्रबखान याने अटक केली.
* मराठ्यांवर दहशत बसावी या हेतूने मराठ्यांच्या राजाला-छत्रपती संभाजीला औरंगजेबाने क्रूरपणे छळून तुळापुरात ठार मारले. त्यांच्याबरोबर कवी कलश यांनाही ठार मारले.
० 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला.
छत्रपती राजाराम महाराज :
* छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र लहान असल्यामुळे 1689 साली राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला.
* सूर्याजी पिसाळच्या फितुरीमुळे मोगलांचे रायगडावर आक्रमण.
* राजाराम महाराजांचे जिंजीला पलायन. जिंजी ही मराठ्यांची नवी राजधानी.
* संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी गनिमी काव्याने मोगलांना जेरीस आणले.
* मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध संताजी-धनाजीने तेवत ठेवले.
० 1700 साली छत्रपती राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला.
० 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मोगल-मराठा संघर्ष संपला. मोगली साम्राज्य नष्ट झाले.
* औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगर येथे झाला. त्याची समाधी खुल्दाबाद येथे आहे.
छत्रपती शाहू आणि महाराणी ताराबाई संघर्ष :
* मोगली साम्राज्य नष्ट झाल्यामुळे मराठ्यांना आपले साम्राज्य वाढवण्यास संधी होती. निजामशाही आदिलशाही पूर्णतः मोडकळीस आली होती.
* छत्रपती संभाजी महाराज यांचा पुत्र शाहू व महाराणी येसूबाई मोगलांच्या कैदेत होती.
* मराठ्यांच्यात फूट पडावी या उद्देशाने मोगलांनी शाहू व येसूबाई यांची सुटका केली. मोगलांचा हा हेतू यशस्वी झाला. महाराणी ताराबाई आणि शाहू यांच्यात संघर्ष सुरू झाला.
* महाराणी ताराबाईंनी राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर आपला पुत्र दुसऱ्या शिवाजी यास गादीवर बसवले आणि मोगलांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध चालू ठेवले.
* महाराणी ताराबाईंनी शाहूस राज्यपद देण्यास नकार दिला.
* शाहूने बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव, कान्होजी आंग्रे यांच्या मदतीने महाराणी ताराराणीवर विजय प्राप्त केला व राज्याभिषेक करवून घेतला.
* शाहू-ताराराणी संघर्ष मिटवण्यासाठी दोन राज्ये निर्माण झाली. कोल्हापूर आणि सातारा.
साताऱ्याची गादी संभाजीपुत्र शाहू चालवू लागले आणि कोल्हापूरची गादी राजारामपुत्र दुसरा शिवाजी चालवू लागले.
* छत्रपती शाहू यांनी बाळाजी विश्वनाथ यांना ‘सेनाकर्ते’ म्हणून नेमणूक केली. इ. स. 1713 मध्ये त्यांची ‘पेशवे’ पदावर नियुक्ती केली.
* पेशवेपद वंशपरंपरागत झाल्यामुळे सर्व सत्ता पेशव्यांच्या हातात गेली. छत्रपतीपद नाममात्र झाले.
० इ. स. 1713 ते 1818 पर्यंत पेशव्यांकडे राजसत्ता होती.