Peshwa: मराठी सत्तेची सूत्रे पेशव्यांकडे 

पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ (1713 ते 1720) :

* महाराणी ताराबाई-शाहू संघर्षात बाळाजी विश्वनाथने शाहूंना सहकार्य केले होते.

* बाळाजी विश्वनाथने मोगलांशी संघर्ष करून त्यांच्याकडून स्वराज्याचा मुलूख परत मिळवला.

* दख्खनमधील सहा सुभ्यांची चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मोगलांकडून मिळवले.

दुसरा पेशवा – पहिला बाजीराव (1720 ते 1740) :

* बाळाजी विश्वनाथ यांचा ज्येष्ठ पुत्र त्यांच्या मृत्यूनंतर पेशवेपदावर विराजमान झाला.

* पहिला बाजीराव कर्तव्यदक्ष पेशवा होता.

* बाजीरावाने मराठ्यांचा प्रतिस्पर्धी निजाम याचा पालखेड येथे 1727 साली व भोपाळ येथे 1737 साली पराभव केला.

* बुंदेलखंडचा राजा छत्रसाल याच्या रक्षणासाठी मोगल सरदार महंमदखान बंगश याचा पराभव केला.

* बाजीरावाने छत्रसाल राजाची मुलगी मस्तानी हिच्याशी विवाह केला. पुढे बाजीराव-मस्तानी या नावाने ही जोडी अजरामर झाली.

* बाजीरावाने दिल्लीवर धडक मारून मराठ्यांचा दरारा निर्माण केला.

* बाजीरावाचा धाकटा भाऊ चिमाजीआप्पाने जुलमी पोर्तुगीजांच्या तावडीतून वसईची मुक्तता केली.

* जंजिऱ्याच्या सिद्धिकडून रायगड, राजापुरी, बिरवाडी, तळे, घोसाळे इत्यादी ठाण्यांची मुक्तता केली.

* बाजीरावाने उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचा प्रभाव वाढवला.

० इ. स. 1740 मध्ये नर्मदाकाठी रावेरखेडी (मध्य प्रदेश) येथे इराणचा शहा नादिरशहा याच्या हिंदुस्थानावरील आक्रमणाला तोंड देताना मृत्यू झाला.

तिसरा पेशवा – बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवा (1740 ते 1761):

* पहिल्या बाजीरावाच्या मृत्यूनंतर त्याया पुत्र बाळाजी बाजीराव ‘पेशवा’ झाला. (1740).

० 1760 साली उदगीरच्या लढाईत सदाशिवरावभाऊंच्या नेतृत्वाखाली निजामाचा पराभव केला.

० 1758 साली बाळाजी बाजीराव यांचा बंधू रघुनाथराव यांनी मराठ्यांचा झेंडा अटकेपार नेला.

* तुळाजी आंग्रे पेशव्यांना जुमानत नसे. बाळाजी बाजीरावाने इंग्रजांची मदत घेऊन तुळाजीचा काटा काढला. त्यात आंग्ग्रांचे आरमार नष्ट झाले. बाळाजीने केलेली ही गंभीर चूक होती.

पानिपतची तिसरी लढाई :

* पानिपतची तिसरी लढाई 1761 साली झाली.

* अफगाणिस्तानचा अहमदशहा अब्दालीने 1748 पासून हिंदुस्थानावर पाच स्वाऱ्या केल्या.

* पाचव्या स्वारीची परिणती (1759) पानिपतच्या युद्धात झाली.

* मराठ्यांनी पंजाबपर्यंत मारलेली धडक अब्दालीला रुचली नव्हती.

* मराठ्यांचा शत्रू रोहिला पठाणांचा नेता नजीबखान याने अब्दालीला मदतीसाठी हाक मारली.

* नजीबखानाला मराठ्यांचे दिल्लीतील वर्चस्व सलत होते.

* त्याने अब्दालीला वेळोवेळी पत्रे लिहून हिंदुस्थानमधील इस्लामच्या रक्षणासाठी मदतीची याचना केली.

* पानिपतच्या लढाईत सदाशिवरावभाऊ मराठ्यांचा सेनापती होता.

* पानिपतच्या लढाईत मराठ्यांची अपरिमित हानी झाली.

* या लढाईत सदाशिवरावभाऊ, विश्वासराव (बाळाजी बाजीराव यांचा पुत्र), दत्ताजी शिंदे, इब्राहिमखान गारदी, जनकोजी शिंदे, यशवंतराव पवार अशा मातब्बर सेनानींचा मृत्यू झाला.

० डिसेंबर 1761 मध्ये बाळाजी बाजीरावाचा पुण्यात मृत्यू झाला.

चौथा पेशवा – थोरले माधवराव पेशवे (1761 ते 1772) :

* बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र थोरला माधवराव पेशवा ‘पेशवेपदाच्या’ गादीवर बसला.

* थोरल्या माधवराव पेशव्यांनी राक्षसभुवनच्या लढाईत (1762) निजामाला पराभूत केले.

* म्हैसूरचा सुलतान हैदर अली याला 1764 साली पराभूत केले.

* महादजी शिंदे यांचे नेतृत्व याच काळात बहरात आले.

* महादजी शिंदेने 1771 साली दिल्ली जिंकली व पुन्हा उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केले.

* थोरल्या माधवराव पेशव्यांचे थेऊर येथे आजारपणामुळे 1772 साली निधन झाले.

पाचवा पेशवा नारायणराव (1772 ते 1773) :

* थोरल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कनिष्ठ भावाला – नारायणरावाला पेशवेपदी नेमले गेले.

* याच काळात पेशव्यांच्या घराण्यात अंतः कलह वाढला.

* रघुनाथराव पेशवा आणि त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी कटकारस्थान करून गारद्यांकरवी नारायणरावांना ठार मारले.

* रघुनाथरावांनी धरावे असा दिलेल्या लखोट्यात आनंदीबाईंनी ‘ध’ चा ‘मा’ केला.

* नारायणराव पेशवा यांचा मृत्यू 1773 साली झाला.

सहावा पेशवा – रघुनाथराव पेशवा (1773 ते 1774) :

* पेशवा नारायणराव यांच्या खुनानंतर त्यांचा चुलता रघुनाथराव• रघुनाथराव पेशवा झाला, पण त्यांना विरोध होता. त्यांच्यावर नारायणरावांच्या खुनाचा आरोप होता.

* रघुनाथराव पेशव्यांविरुद्ध नाना फडणवीस, महादजी शिंदे, सखारामबापू इत्यादी मातब्बर बारा मंडळी एकत्र आले आणि रघुनाथरावांना पेशवेपदावरून हटवले.

* रघुनाथरावांविरुद्ध केलेले हे कारस्थान ‘बारभाई कारस्थान’ म्हणून इतिहासप्रसिद्ध आहे.

सातवा पेशवा सवाई माधवराव (1774 ते 1795) :

* बारभाईंच्या कारस्थानानंतर रघुनाथरावांना पेशवेपदास मुकावे लागले.

* नारायणरावांच्या मृत्यूनंतर त्यांची गरोदर पत्नी प्रसूत झाली. तिला पुत्र झाला. त्याचे नाव ‘सवाई माधवराव’ असे ठेवण्यात आले.

* बारभाईंनी सवाई माधवराव पाळण्यात असतानाच त्याला पेशवेपदाच्या गादीवर बसवले व त्याच्या नावाने बारभाई राज्यकारभार करू लागले.

* या काळात महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्याकडे सत्तासूत्रे आली होती.

* या दोघांनी मराठ्यांच्या साम्राज्याचे रक्षण केले, मराठा साम्राज्य वाढवले.

पहिले इंग्रज-मराठे युद्ध (1775 ते 1782) :

* गृहकलहामुळे रघुनाथराव इंग्रजांना जाऊन मिळाले.

० त्यांनी इंग्रजांशी 1775 मध्ये सुरत येथे पेशवेपद मिळवून देण्यासाठी तह केला.

* पेशवेपदाच्या बदल्यात इंग्रजांना मुंबई बेटाच्या सीमेवरील साष्टी बेट व अन्य मुलूख देण्याचे ठरले.

* नाना फडणवीसाने इंग्रजांविरुद्ध पेशवे, नागपूरचे भोसले, म्हैसूरचा हैदर अली, निजाम या सर्व सत्तांना एकत्र आणले.

* या युद्धात इंग्रजांना माघार घ्यावी लागली व तह करावा लागला. (1782).

* तहात साष्टी बेट इंग्रजांकडेच राहिले.

खर्ड्याची लढाई (1795):

निजाम आणि मराठा यांच्यात 1795 मध्ये खर्थ्याची लढाई झाली. या लढाईत निजामाचा पराभव झाला.

हा पहिल्या बाजीरावाचा पुत्र पेशवेपदाच्या गादीवर बसला.

० 1795 साली सवाई माधवराव पेशवा यांचे निधन झाले.

आठवा पेशवा – दुसरा बाजीराव (1796 ते 1818) :

सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर रघुनाथरावांचा पुत्र दुसरा बाजीराव पेशवा झाला. त्याच्या कारकिर्दीतच मराठी सत्तेचा अस्त झाला आणि इंग्रजांची सत्ता आली.

* वसईचा तह : यशवंतराव होळकर आणि दुसरा बाजीराव यांच्या संघर्षातून दुसरा बाजीराव पळून जाऊन इंग्रजांना मिळाला. त्याने इंग्रजांशी वसई येथे तह केला. या तहानुसार बाजीरावाला पेशवेपदावर बसवण्याची जबाबदारी इंग्रजांची होती व त्याच्या बदल्यात गुजरात, कर्नाटक, तापी, नर्मदा नद्यांकाठचा मुलूख इंग्रजांना मिळाला.

या तहामुळे दुसरा बाजीराव आपले स्वातंत्र्य गमावून बसला. हा तह 1802 साली झाला.

• इंग्रज-मराठे यांच्यातील दुसरे युद्ध (1803 ते 1805) :

इंग्रज आणि मराठे यांच्यात दुसऱ्यांदा झालेल्या युद्धात इंग्रजांनी भोसले, होळकर, शिंदे यांचा पराभव केला. प्रत्येक जहागीरदाराने आपला मुलूख तहात दिला.

• इंग्रज-मराठे यांच्यातील तिसरे युद्ध (1817 ते 1818) :

या निर्णायक युद्धात इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव केला व पुणे ताब्यात घेतले. ही घटना 1817 साली घडली. बाजीराव पुढे 1818 मध्ये इंग्रजांना शरण गेला आणि मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.

1818 नंतर केवळ कोल्हापूर संस्थान भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वतंत्र राहिले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर कोल्हापूर संस्थान भारतात विलीन झाले.

Leave a comment