साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
विल्यम गोल्डिंग
William Golding
जन्म : 19 सप्टेंबर 1911
मृत्यू: 19 जून 1993
राष्ट्रीयत्व : ब्रिटिश
पुरस्कार वर्ष: 1983
विल्यम गोल्डिंग हे थोर कादंबरीकार होते. ते ब्रिटनच्या नाविक दलात नोकरी करत होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी भाग घेतला होता. युद्धातील भयंकर स्थिती अनुभवूनही त्यांनी आपल्यातील लेखक जिवंत ठेवला. ‘लॉर्ड ऑफ द फ्लाइज’ ही त्यांची सर्वश्रेष्ठ कादंबरी. त्या कादंबरीवर आधारित चित्रपट निर्मिती झाली. ‘दि इनहेरिटेज’, ‘फ्री फॉल’ इत्यादी पुस्तके खूप गाजली.