साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
जारास्लाव सेईफर्ट
Jaroslav Seifert
जन्म : 23 सप्टेंबर 1901
मृत्यू : 10 जानेवारी 1986
राष्ट्रीयत्व : झेकोस्लावियन
पुरस्कार वर्ष: 1984
जारास्लाव सेईफर्ट हे झेकोस्लाव्हिया देशाचे एक श्रेष्ठ कवी होते. जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात झेकोस्लाव्हियावर आक्रमण केले. त्या देशावर कब्जा केला. तेव्हा जारास्लाव यांनी देशभक्तीच्या कविता लिहिल्या. त्यामुळे त्यांची प्रसिद्धी खूप वाढली. ‘अम्ब्रेला फ्रॉम पिकाडोली’, ‘ऑल ब्युटी ऑफ द वर्ल्ड’, ‘कन्सर्ट एट द आयर्लंड’, ‘मोजॉर्ट इन प्राग’ इत्यादी अनेक प्रतिभासंपन्न कवितासंग्रहामुळे त्यांना 1984 चा नोबेल पुरस्कार मिळाला.