साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
जोसेफ ब्रॉडस्की
Joseph Brodsky
जन्म: 24 मे 1940
मृत्यू: 28 जानेवारी 1996
राष्ट्रीयत्व : रशियन/अमेरिकन
पुरस्कार वर्ष : 1987
जोसेफ ब्रॉड्स्की यांचा जन्म रशियात झाला आणि ते अमेरिकेत स्थायिक झाले. या अमेरिकन कवीने स्वतः अनेक कविता लिहिल्या. त्याचबरोबर विल्यम फॉक्नर, कोनरॉड इत्यादी कवींच्या कवितांचा रशियन भाषेत अनुवाद केले. त्यांचे ‘पोएम्स ऑफ जोसेफ ब्रॉड्स्की’, ‘वर्सेज ऑन द विंटर कँपेन’, ‘रोमन एलिजिस’ इत्यादी कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.