Artificial intelligence म्हणजेच AI तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाचा सर्रास सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. शेतीशी निगडित अनेक उत्पादने AI तंत्रज्ञानाचा वापर करून घेतले जातात. पारंपारिक पद्धतीने जेवढे उसाचे उत्पादन होते, त्याच्या दुप्पट उत्पादन हे ए आय तंत्रज्ञान वापरल्यामुळे होते. आता आपण AI तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे पीक आणि त्यांचे दुप्पट उत्पादन कसे घ्यायचे ते पाहू.
बारामती ॲग्रीकल्चर ट्रस्टने तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे उत्पादन कसे वाढवायचे याचे प्रात्यक्षिक केले आहे. त्याची आपण सविस्तर माहिती घेऊ.
AI तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे उत्पादन कसे वाढवायचे? यासाठी जागतिक लेव्हलच्या अनेक Al तंत्रज्ञांची आणि अनेक अनुभवी लोकांची मदत घेतली आहे की ज्यामुळे तंत्रज्ञानाचे सॉफ्टवेअर उत्तम पद्धतीने काम करेल.
बारामती येथे एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारचे पण एकाच जातीचे ऊस पाहायला मिळतात. एक वाफा या तंत्रज्ञानाने घेतलेल्या ऊस पिकाचा पाहायला मिळतो. तर दुसरा वाफा पारंपरिक पद्धतीने घेतलेले ऊस पिक पाहायला मिळते. दोन्ही वाफ्यांकडे सहज नजर टाकली असता ए आय तंत्रज्ञानाने घेतलेला ऊस पिक सहज नजरेत भरतो. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे साधारणतः 30 ते 40% उत्पादन वाढल्याचे बारामती एग्रीकल्चर ट्रस्टने सिद्ध केले आहे. भविष्यात याहीपेक्षा चांगले उत्पादन वाढू शकते आणि हे केवळ तंत्रज्ञानामुळेच शक्य होणार आहे. थोडक्यात शेतकऱ्यांनी आता बदलले पाहिजे. शेतामध्ये ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून पीक घेतले पाहिजे.
AI तंत्रज्ञानाने उसाचे पीक कसे घेतले जाते?
सॅटलाईट चा वापर
AI तंत्रज्ञानाचा वापर अधिक चांगल्या प्रकारे केला जातो. कोण कोणत्या बाबी केल्या जातात ते आपण पाहू.
1 माती परीक्षण
सॅटलाईट द्वारे माती परीक्षण केल्यामुळे पिकाला कोणत्या प्रकारचे खत देणे आवश्यक आहे हे समजते. शिवाय मातीची स्थिती काय आहे हेही समजते. त्यामुळे अशा मातीत कोणते पीक करावे याची माहिती मिळते माती परीक्षण हा पीक पद्धतीतील आत्मा आहे. पिकांना होणारा संभाव्य रोग आपणास माती परीक्षणामुळे समजतो.
2 कीड नियंत्रण
सॅटलाईट द्वारे वारंवार पिकांची पाहणी केल्यामुळे पिकांचे स्थिती काय आहे, पिकांना होणारा संभाव्य आजार आणि कीड याची माहिती आपणास अगोदरच समजते .त्याचा फायदा असा होतो की आपणास कीड होण्यापूर्वीच तिचा बंदोबस्त करता येतो .त्यामुळे खर्चात बचत होते .पिकांची वाढ चांगली होते.
3 खताची मात्रा
सॅटलाईट द्वारे पिकांचे वेळोवेळी परीक्षण केल्यामुळे आपणास पिकांना योग्य प्रमाणात खताची मात्रा देता येते. पिकांना कोणत्या प्रकारचे खत द्यायचे याची माहिती समजते. त्यामुळे खताची अतिरिक्त मात्रा टाळता येते. आणि खर्चात बचत होते.
4 जमिनीची सुपीकता
ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून सॅटलाईट द्वारे जमिनीची प्रत ठरवण्यास मदत होते. त्यामुळे जमीन किती सुपीक आहे, हे आपणास समजते. जमिनीची सुपीकता समजली की पिकाची कोणती जात त्या जमिनीसाठी योग्य आहे हे समजते. त्यामुळे शेतकरी योग्य पिकाची जात निवडू शकतो आणि आपले उत्पादन वाढवू शकतो. आता आपण टी आय तंत्रज्ञानाचा वापर करून आय ओ टी हे तंत्रज्ञान शेतीसाठी कसे वापरतात ,ते पाहणार आहोत.
I O T तंत्रज्ञान
आय वोटी तंत्रज्ञानामध्ये सेन्सर चा वापर केला जातो. या संसदच्या वापरामुळे पिकांना योग्य प्रमाणात पाणी देणे, पिकांना होणारे संभाव्य रोग हवामान रिपोर्ट इत्यादी माहिती मिळते. त्यामुळे शेतकऱ्याला आपल्या पिकाची काळजी घेण्यास मदत होते.
योग्य प्रमाणात पाणी देणे
आय ओ टी तंत्रज्ञानात पिकांना किती पाण्याची आवश्यकता आहे ,हे आपणास समजते. त्याद्वारे आवश्यक आहे तेवढेच पाणी देता येते. पिकांची चांगली वाढ होण्यासाठी अतिरिक्त पाणी टाळावे लागते. जमिनीचा वापसा टिकून ठेवावा लागतो. पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळाल्यामुळे आपली खर्चाची बचत होते . विज बिल वाचवता येते.
हवामान केंद्र weather center
उसाचे पीक अत्यंत चांगले येण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड असावी लागते. तंत्रज्ञानाचा एक पुढचा भाग म्हणूनच हवामान केंद्र सुरू करता येते. या वेदर सेंटर द्वारे पिकांची झाली खुशाली आपणास समजण्यास मदत होते. पावसाची शक्यता, ढगाळ वातावरण, पिकांना होणारे संभाव्य रोग, खतांची मात्रा, योग्य प्रमाणात पाणी देणे, याची इत्यंभूत माहिती कळते. त्याचा फायदा पिकाचे उत्पादन वाढवण्यास मदत होते.
कृषि ॲप
कृषी ॲप या तंत्रज्ञानाला जोडलेले असल्यामुळे या ॲपद्वारे शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानाद्वारे घेतलेल्या उसाच्या पिकाचे माहिती मिळते. केवळ उसाच्या पिकाचीच नव्हे ,तर अन्य कोणत्याही पिकाचे माहिती वेळच्या वेळी मिळत राहते. त्यामुळे शेतकऱ्याला या ॲपद्वारे पिकाच्या योग्य जातीची निवड करता येते आणि आपले उत्पादन वाढवता येते. 86032 आणि 265 या दोन उसाच्या जाती अधिक उत्पादन देण्यासाठी उपयुक्त ठरतात. आपल्या शेतात न्याय तंत्रज्ञानाने पीक द्या आणि अधिक उत्पादन वाढवा. शिवाय चांगली बचत ही करा.