साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
जोस सारामागो
Jose Saramago
जन्म : 16 नोव्हेंबर 1922
मृत्यू: 18 जून 2010
राष्ट्रीयत्व : पोर्तुगीज
पुरस्कार वर्ष: 1998
1998 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार जोस सारामागो यांना मिळाला. पहिल्यांदाच पोर्तुगीज व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या लेखनात कल्पनाशक्ती, विडंबन, करुणा यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो.