नोबेल शांतता पुरस्कार विजेते
इलिहू रुट
Elihu Root
जन्म : 15 फेब्रुवारी 1845
मृत्यू : 7 फेब्रुवारी 1937
राष्ट्रीयत्व : अमेरिकन
पुरस्कार वर्ष: 1912
इलिहू रुट यांनी जगात विशेषतः पाश्चात्त्य देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेले प्रयत्न खूपच व्यापक आहेत. त्यांनी अमेरिकेतील स्पेनच्या वसाहती अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी शासकीय व्यवस्थेत भाग घेतला. फिलिपाईन्स द्वीप समूह अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आणला. त्यामुळे तेथे शांतता प्रस्थापित करणे सोपे झाले. त्याचबरोबर त्यांनी लॅटिन अमेरिकी देशांना ‘हेग’ या ठिकाणी होणाऱ्या दुसऱ्या जागतिक शांतता संमेलनाला उपस्थित राहण्यास प्रेरित केले. युरोपीय राष्ट्रांमध्ये सुद्धा शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थी केली होती.