नोबेल शांतता पुरस्कार विजेते
टोबिआज माईकेल कारेल असर
Tobias Michael Carel Asser
जन्म : 28 एप्रिल 1838
मृत्यू : 29 जुलै 1913
राष्ट्रीयत्व : डच
पुरस्कार वर्ष: 1911
टोबिआज माईकेल कारेल असर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. 1899 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता संमेलन संपन्न झाले होते. या गोष्टीचे औचित्य साधून टोबिआज असर यांनी ‘आंतरराष्ट्रीय आरब्रिटेशन कोर्ट’ची स्थापना करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यासाठीच त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कोर्टात सर्वच देशातील कायदेतज्ज्ञांची नियुक्ती होत असते. भारतातील न्यायाधीशांचीही याच न्यायालयात नियुक्ती होत असते.