नोबेल शांतता पुरस्कार विजेते
लुई रेनॉल्ट
Louis Renault
जन्म: 21 मे 1843
मृत्यू : 8 फेब्रुवारी 1918
राष्ट्रीयत्व : फ्रेंच
पुरस्कार वर्ष: 1907
लुई रेनॉल्ट हे इटालियन पत्रकार अर्नेस्टो टिओडोरो मोनेटा यांच्याबरोबर शांतीचा नोबेल पुरस्कार मिळणारे भागीदार होते. त्यांना 1907 साली हा पुरस्कार मिळाला. ते स्वतः कायदेतज्ज्ञ व न्यायाधीश होते. देशोदेशांतील वाद-विवादांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी 1906 साली रेडक्रॉस संस्थेत फेरबदल करून या संस्थेचे पुनरुज्जीवन करण्याचे महान कार्य केले.