नोबेल शांतता पुरस्कार विजेते
थिओडोर रुझवेल्ट
Theodore Roosevelt
जन्म : 27 ऑक्टोबर 1858
मृत्यू : 6 जानेवारी 1919
राष्ट्रीयत्व : अमेरिकन
पुरस्कार वर्ष: 1906
थियोडोर रुझवेल्ट हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी आयुष्यभर जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. रशिया आणि जपान या दोन देशांत वाढलेला तणाव कमी करून शांतता निर्माण केल्याबद्दल त्यांना 1906 साली नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. 1905 साली त्यांनी अमेरिकेतील ‘पोर्टस् ऑफ साऊथ’ या ठिकाणी रशिया आणि जपान यांच्यात शांतता करार घडवून आणला होता.