*मध्ययुगीन भारतातील व्यवसाय:
• मध्ययुगात आठव्या, नवव्या शतकात मंदावलेल्या व्यापाराला दहाव्या शतकात चालना मिळाली.
• अरब साम्राज्याच्या स्थापनेनंतर भारतातील कापड, सुगंधी द्रव्ये, मसाल्याचे पदार्थ यांची मोठी मागणी अरबांकडून होऊ लागली.
• चीनकडून मसाल्याचे पदार्थ, हस्तिदंत, काचेचे सामान, औषधी द्रव्ये, लाख इत्यादींची मागणी होऊ लागली.
• चोळांनी इ. स. 1077 मध्ये आपले व्यापारी शिष्टमंडळ चीनला पाठवले.
• ताम्रलिप्ती बंदर व्यापाऱ्यांनी गजबजले होते.
• याच काळात व्यापाऱ्यांची अनेक कामे व्यापाऱ्यांच्या श्रेणीमार्फत होऊ लागली.
*मध्ययुगीन भारतातील नगर विकास:
• नव्याने उदयास आलेल्या राजसत्तांमुळे मालखेड, उज्जैन, चंपानेर इत्यादी नगरे भरभराटीस आली.
• खेड्यांत शेती हा मुख्य व्यवसाय होता.
• कुंभारकाम, लोहारकाम, सुतारकाम इत्यादी व्यवसायांना चालना मिळा
*मध्ययुगीन भारतातील सामाजिक स्थिती :
• जातिसंस्था व स्त्रियांचा सामाजिक दर्जा यांत बदल झाला नाही,
• भारतीय समाज परंपरानिष्ठ राहिला.
• जाती-जातींमधील संबंध हे रूढी, परंपरांप्रमाणे ठरल्याप्रमाणे होत,
• जातीबाहेर लग्न करण्यास बंदी होती.
• जातीबाहेरील व्यक्तीबरोबर खाणे-पिणे निषिद्ध मानले जाई.
• अस्पृश्यता वाढली. जाती-जातींमधील कडक निर्बंधामुळे विचारां देवाण-घेवाण बंद झाली.
• सामाजिक विषमतेमुळे वैज्ञानिक प्रगती खुंटली.
• प्रार्थनास्थळांचे वाढते सामाजिक महत्त्व :
• प्रार्थनास्थळांचे महत्त्व वाढले.
• प्रार्थनास्थळी, उत्सवप्रसंगी लोक एकत्र येऊ लागले.
• गायन-वादन, नृत्य, मूर्तिकला, स्थापत्यकला इत्यादी कला मंदिराच्या आवारात शिकवल्या जात.
• मंदिरांत शाळा, गावच्या पंचायती भरत.
• विविध कलांचा विकास
*मध्ययुगीन भारतातील शिल्पकला:
• मंदिराच्या दगडी भिंतींवर मूर्ती कोरलेल्या असत. स्वतंत्रपणे पाषाणात मूर्ती कोरलेल्या असत.
• श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची मूर्ती याच काळात होऊन गेली.
*मध्ययुगीन भारतातील लघुचित्रे :
• हस्तलिखित ग्रंथ सुशोभित करण्यासाठी लहान-लहान आकाराची चित्रे काढण्यात येऊ लागली.
• पाल राजांच्या काळात लघुचित्रे मोठ्या प्रमाणात काढली जाऊ लागली.
*मध्ययुगीन भारतातील मंदिर वास्तुकला:
• मध्ययुगीन काळात मंदिर स्थापत्यकला विकसित झाली.
• भव्यता, नाजूक रेखीव काम, कोरीव काम, उंच शिखरे, गोपी मंद्रि पत्याची वैशिष्ट्ये होती.
• राजस्थानमधील दिलवाडा येथील जैन मंदिर प्रसिद्ध आहेत.
• हळेबीड येथील होयसळकालीन मंदिराचे कोरीव काम प्रसिद्ध आहे.
• खजुराहो येथील शिव, विष्णू यांची मंदिरे व शिल्पकला प्रसिद्ध आहेत. कंडारीय महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. (खजुराहो).
• भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिर प्रसिद्ध आहे.
*मध्ययुगीन भारत:प्रादेशिक भाषांतील वाङ्मय :
• सोमदेव – कथासरितसागर
• जयदेव – गीतगोविंद
• कल्हन – राजतरंगिणी
• पेरियपुराणम (तमिळ भाषेतील ग्रंथ)
• कविराज मार्ग (कन्नड)
• पौमचारियु, महापुराण (अपभ्रा भाषा)