नोबेल शांतता पुरस्कार विजेते
कार्डल हल
Cordell Hull
जन्म: 2 ऑक्टोबर 1871
मृत्यू: 23 जुलै 1955
राष्ट्रीयत्व : अमेरिकन
पुरस्कार वर्ष : 1945
कार्डल हल यांना संयुक्त राष्ट्रसंघाचे (United Nations) जनक मानले जाते. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रैंकलिन रुझवेल्ट यांनी कार्डल हल यांची विदेश सचिव म्हणून नेमणूक केली होती. ‘जोपर्यंत देशादेशांत व्यापारी प्रतिबंध थांबत नाही आणि कर कमी होत नाही तोपर्यंत जगात शांता निर्माण होणे कठीण आहे’ असे वुड्रो विल्सन यांनी म्हटले होते. त्यांच्या या मताशी कार्डल हल सहमत होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना 1945 चा शांततेचा नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आला.