*मध्ययुगीन भारत
• अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सलीम ऊर्फ जहांगीर बादशाहा झाला.
• जहांगीरला राजपुत्र सुसरोच्या बंडाला तोंड द्यावे लागले.
• जहांगीरने बंगाल, पंजाबमधील कांगडा प्रदेश जिंकून घेतले.
• जहांगीरचा मृत्यू इ. स. 1627 मध्ये झाला.
• जहांगीर न्यायी होता.
• त्याचा ‘तुझुक-इ-जहांगिरी’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
• जहांगीरची पत्नी ‘नूरजहान’ इतिहासप्रसिद्ध व्यक्ती होती.
• जहांगीरच्या कारभारात नूरजहानचा सहभाग असे.
• तिचा सुसंस्कृतपणा आणि बुद्धिमत्ता या गोष्टींचा जहांगीरवर प्रभाव होता.
• ती निसर्गप्रेमी आणि कलासक्त होती.
*शाहजहान:
• जहांगिराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा ‘शाहजहान’ बादशाह झाला.
• इ. स. 1636 मध्ये आदिलशाहीच्या मदतीने त्याने निजामशाहीचा पाडाव केला.
• इ. स. 1657 मध्ये शाहजहान आजारी पडला आणि त्याच्या पुत्रांच्यात वारसायुद्ध सुरू झाले.
• औरंगजेबाने शाहजहानला नजरकैदेत टाकले. इ. स. 1666 मध्ये नजरकैदेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
• पत्नीच्या अकाली मृत्यूने शाहजहान घायाळ झाला होता.
• पत्नी मुमताज महलच्या आठवणीखातर त्याने आग्रा येथे ‘ताजमहाल’ बांधला.
*औरंगजेब:
• इ. स. 1658 मध्ये औरंगजेब मुघल बादशाह झाला.
• औरंगजेबाने काश्मीर, अहमदनगर, आसाम, दक्षिण महाराष्ट्र जिंकून आपले साम्राज्य वाढवले होते.
• औरंगजेबाच्या काळात मुघल सत्ता भारतभर पसरली होती.
• पठाणांनी 1667 मध्ये मुघल सत्तेविरुद्ध बंड केले होते.
• जाटांनी 1669 मध्ये बंड केले होते.
• शिखांचे नववे गुरू गुरूतेबाबहादूर यांच्याशी औरंगजेबाचे सलोख्याचे धोरण होते.
• औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणामुळे शीख-मुघल संघर्ष सुरू झाला.
• औरंगजेबने गुरू तेगबहादूर यांना कैद करून त्यांचा शिरच्छेद केला.
• गुरूगोविंदसिंग :
• गुरूतेगबहादूर यांच्या मृत्यूनंतर गुरूगोविंदसिंग शिखांचे दहावे गुरू झाले.
• गुरूगोविंदसिंग यांनी शीख समाज एकजूट केला.
• त्यांनी तरुणांना एकत्र करून एक दल उभे केले. त्याला ‘खालसा दल’ म्हणतात.
• ‘आनंदपूर’ हे शिखांचे प्रमुख केंद्र होते.
• गुरूगोविंदसिंग महाराष्ट्रातील नांदेड येथे असताना त्यांच्यावर खुनी हल्ला झाला.
• इ. स. 1708 मध्ये गुरूगोविंदसिंग यांचा खून झाला.
*औरंगजेब-मराठा संघर्ष:
• शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले होते.
• मराठी सत्ता मोडीत काढण्यासाठी 1682 साली औरंगजेब महाराष्ट्रात आला.
• मराठ्यांचा राजा छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करून त्यांची क्रूरपणे हत्या केली.
• मराठ्यांची सत्ता नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने आटोकाट प्रयत्न केले; परंतु त्यात तो अयशस्वी झाला.
• मराठ्यांशी संघर्ष सुरू असताना 1707 मध्ये अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला.
• औरंगजेबानंतरचे मुघल बादशाह :
• औरंगजेबानंतर त्याचा मुलगा बहादूरशाह गादीवर बसला.
• त्याची कारकीर्द अल्प काळ ठरली.
• इ. स. 1739 मध्ये इराणचा बादशाह नादिरशहाने दिल्लीवर आक्रमण केले.
• त्याने मयूर सिंहासन व कोहिनूर हिऱ्यासह येथील संपत्तीची लूट केली.
• अब्दालीने दिल्लीवर आक्रमण केले.
• इ. स. 1761नंतर मुघलशाही नाममात्र राहिली.