नोबेल शांतता पुरस्कार विजेते
अमेरिकन फ्रेंडस् सर्व्हिस कमिटी
American Friends Service Committee
स्थापना : 1917, अमेरिका
पुरस्कार वर्ष : 1947
A.F.S.C. ची स्थापना अमेरिका आणि कॅनडा येथील काही मित्रांनी केली होती. फ्रेंड्स सर्व्हिस कौन्सिल हे या संस्थेचे ब्रिटिश रूप आहे. या संस्थेमार्फत समानतेचा संदेश दिला जातो. ईश्वर सर्वांना समानतेने वागवतो. माणसानेही माणसाशी वागताना भेदभाव न करता समानतेने वागले पाहिजे. असा ही संस्था स्थापण्यामागे हेतू होता. या संस्थेने सामाजिक सुधारणेसाठी आणि जगभर शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. म्हणून या संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.