नोबेल शांतता पुरस्कार विजेते
एमिली ग्रीन बाल्स
Emily Greene Balch
जन्म : 8 जानेवारी 1867
मृत्यू : 9 जानेवारी 1961
राष्ट्रीयत्व : अमेरिकन
पुरस्कार वर्ष : 1946
एमिली ग्रीन बाल्स या महिला पहिल्या महायुद्धात आणि त्यानंतर सातत्याने जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंदोलन करत होत्या. त्या या शांतता आंदोलनाच्या नेत्या होत्या. त्यांनी अमेरिकेत प्रवासी गुलाम लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्या समाजशास्त्र, राजनीती, विज्ञान, अर्थशास्त्र इत्यादी विषयात तज्ज्ञ होत्या. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.