*महाराष्ट्रातील प्रशासन :
• शिवपूर्वकाळात महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश विजापूरचा आदिलशाह, अहमदनगरचा निजामशाहा यांच्या ताब्यात होता.
• कोकण किनारपट्टीवर सिद्धी व पोर्तुगीज यांच्या सत्ता होत्या.
• आपले प्रशासन चालवण्यासाठी निजामशाहा व आदिलशाहा स्थानिक तोकांची मदत घेत.
• किल्लेदार, हिशेबनीस, कारकून अशा पदांवर स्थानिक मराठी लोक असत.
• मराठी सरदार व सैनिक यांना लष्करात मोठ्या प्रमाणात स्थान होते
• मराठी सरदारांना जहागिरी दिल्या.
• मराठी सरदारांपैकी मोरे, घाटगे, निंबाळकर, जाधव, घोरपडे,स भोसले इत्यादी घराणी प्रसिद्ध होती.
• जमीन महसूल गोळा करण्याचे काम देशमुख, देशपांडे करत. त्याना वतन मिळत. वतन मिळालेल्या अधिकाऱ्याला वतनदार म्हणत.
• वतनदार शिरजोर बनत, राजाचे जमानत नसत. रयतेचे शोषण करत.
*सामाजिक स्थिती:
• समाजात सत्ताधारी वर्ग व सर्वसामान्य वर्ग असे दोन वर्ग निर्माण झाले होते.
• जमीन उत्पादनक्षमता कमी होती. शेती पावसावर अवलंबून होती.
• शेतकऱ्यांना दुष्काळांना तोंड द्यावे लागे.
• राज्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असे.
*संतांचे कार्य :
• समाजात अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा प्रभाव होता.
• लोक देवदेवतांच्या आहारी गेले होते.
• लोकांच्यातील प्रयत्नशीलता कमी झाली होती.
• संतांनी समाजात चैतन्य निर्माण केले.
• आपली संस्कृती, भाषा, प्रदेश याचा अभिमान निर्माण केला.
• संत ज्ञानेश्वरांनी ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय साधला.
• संत नामदेवांनी निरर्थक कर्मकांडावर टीका केली.
• संत एकनाथांनी कर्मठपणास विरोध केला.
• संतांच्या संदेशांमुळे महाराष्ट्रात आत्मविश्वास निर्माण झाला.