Russia-Ukraine war-रशिया-युक्रेन युद्ध भडकले: युक्रेनने ड्रोनच्या सहाय्याने केला हल्ला, ही तर तिसऱ्या महायुद्धाची नांदी 

फेब्रुवारी 2014 पासून रशिया आणि युक्रेनमध्ये वेळोवेळी युद्धजन्य तणाव होत आहेत. दोन्ही देशांकडून वेळोवेळी हल्ले झालेले आहेत.पण गेल्या वर्षापासून पुतीन यांनी वारंवार हल्ले करून युक्रेनचे कंबरडे मोडले होते; पण रविवार दिनांक 3 जून 2025 मध्ये युक्रेनने ड्रोनच्या सहाय्याने जो हल्ला केला. त्यामुळे रशिया हादरून गेला आहे. ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर नाही ना?असा प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये निर्माण होतो. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याची पाहूया सविस्तर माहिती..

युक्रेनचा ड्रोन हल्ला: 117 ड्रोन च्या साहाय्याने रशियाची लढाऊ विमाने केली नष्ट Ukraine drone attack: Ukraine destroys Russian fighter jets with the help of 117 drones

रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी युक्रेनने रशियावर हल्ला करण्यासाठी 117 ड्रोनचा वापर केला. हे ड्रोन रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने वापरले गेले. सुमारे 4300 km वरून ड्रोनला रिमोट कंट्रोलच्या सूचना गेल्यावर रशियाची 41 शक्तिशाली लढाऊ विमाने नष्ट झाली. या हल्ल्यामुळे रशियाच्या लष्करी शक्तीवर खूप मोठा परिणाम झाला.

युक्रेनचे ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ यशस्वी”: Ukraine’s Operation Spider Web is a success

गेली अनेक वर्षे युक्रेन बलाढ्य रशियाबरोबर झुंज देत आहे. या लढाईत आत्तापर्यंत रशियात वरचढ ठरला आहे.पण 1 जून 2025 मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्याने रशिया चांगलीच हबकली आहे.

युक्रेनने ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अत्यंत गुप्तता पाळली होती. त्यासाठी गेले वर्षभर युक्रेन नियोजन करत होते. अत्यंत गुप्ततेने एका कंटेनरमधून युक्रेन-रशियाच्या सीमेपासून सुमारे 4300 किमीपर्यंत हे ड्रोन पोहोचले गेले आणि त्यानंतर युक्रेनने आपल्या देशातून रिमोट कंट्रोलच्या साहाह्याने ड्रोनचा वापर करून रशियाच्या शक्तिशाली लढाऊ विमानांवर हल्ले केले. या 117 ड्रोननी सुमारे 41 अत्यंत शक्तिशाली विमाने नष्ट करून रशियाची लष्करी ताकद कमी केली.

युक्रेनच्या इतिहासातील सर्वात लांब पल्ल्याची ही मोहीम युक्रेनने यशस्वी केली आणि या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व लष्करी यंत्रणेला शाबासकी दिली. हल्ल्याच्या तयारीसाठी अत्यंत क्लिष्ट लॉजिस्टिक वापरण्यात आले होते. ड्रोन आधीच रशियन भूभागात गुप्तपणे पोहोचले होते. ट्रकवरील लाकडी केबिनच्या छपराखाली ड्रोन लपवले होते. हे ड्रोन रशियात पोहोचल्यानंतर त्या केबिनमधून रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने बाहेर काढले गेले आणि रशियाच्या विमानांवर हल्ले चढवले गेले.

तिसरे महायुद्ध सुरू होण्याची शक्यता :Possibility of World War III

युक्रेनने 117 ड्रोनच्या साहाय्याने रशियाची शक्तिशाली विमाने नष्ट केल्यामुळे रशिया पुन्हा मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे. यातून युक्रेन-रशिया युद्ध त्या प्रमाणात भडकण्याची शक्यता आहे. अर्थात त्यामुळे या युद्धात अनेक बलाढ्य देश भाग घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित तिसरे महायुद्ध होण्याची अधिक शक्यता दिसत आहे.

Leave a comment