अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबाद शहरातच अपघात झाला. हे विमान एका उंच इमारतीला थडकले आणि या विमानातून प्रवास करणारे संपूर्ण प्रवासी आगीत होरपळून ठार झाले.
विमानातील सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू :All 242 passengers plane die in blaze.
एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीम लाइनर या विमानाचा अपघात घडला. या विमानातून 169 भारतीय ,53 ब्रिटिश, 7 पोर्तुगाल आणि 1 कॅनडा असे एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते. विमानाचा अपघात इतका प्रचंड झाला की या 242 पैकी एकही प्रवासी अथवा विमानातील स्टाफ पैकी कोणीही जिवंत राहिले नाही. दुर्दैवाने सर्वच्या सर्व विमान प्रवाशांचा आणि विमानात असल्यास या एअर इंडियाच्या स्टाफचा वैमानिकांसह सर्वांचा मृत्यू झाला. ही दुःखद घटना गुरुवार दिनांक 12 जून 2025 रोजी दुपारी घडली. हे विमान अहमदाबादहून लंडनला चालले होते. पण अहमदाबाद शहर ओलांडण्यापूर्वीच या विमानाचा अपघात झाला आणि सर्व काही नष्ट झाले.