Insomnia: a global problem-निद्रानाश: एक जागतिक समस्या

सध्याच्या धावपळीच्या युगात आणि ताणतणावाच्या युगात जगातील बहुतांश देशांमध्ये निद्रानाशाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब खूप गंभीर आहे. निद्रानाशाची समस्या का निर्माण होते याबद्दल आपण माहिती घेऊ.

निद्रानाश म्हणजे काय? What is insomnia?

एखाद्या व्यक्तीला सहा तासांपेक्षा कमी झोप लागत असेल तर त्याला निद्रानाश म्हणतात. काही लोकांना तर तीन ते चार तास झोप लागते. काही लोकांना रात्री झोपल्यानंतर मध्यरात्री जाग येते ते पुन्हा झोप लागतच नाही. या सर्व गोष्टी निद्रानाशाशी संबंधित आहेत.

निद्रानाशाची प्रमुख कारणे: Reasons of insomnia

ताणतणाव आणि चिंता

प्रत्येक व्यक्तीला कोणती ना कोणती चिंता ग्रासत असते. याशिवाय अनेक गोष्टींचा ताण त्यांना येत असतो. धावपळीच्या युगात आर्थिक समस्या, आपले काम नीट न होणे,नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांच्या आदेशाचा ताण, कामाची वेळेत पूर्तता न आल्यामुळे ताण, मुलांच्या शिक्षणाचा ताण, कौटुंबिक वाद विवादाचा ताण, अशा अनेक कारणांनी ताण तणाव येत असतो. याशिवाय आपल्याला अनेक चिंता त्रास देत असतात. आपण आपल्या समस्यांचे नेहमी चिंतन करत असतो.त्या समस्या सोडवण्याऐवजी त्याचाच विचार करत असतो. त्यामुळे आपली चिंता वाढते आणि मग त्याचे परिणाम म्हणून निद्रानाश होतो.

आहार व खाण्यापिण्याची सवय

आपण रात्री झोपण्यापूर्वी किमान तीन तास अगोदर आपला आहार घेतला पाहिजे. याशिवाय रात्रीचा आहार हा कमीत कमी घेतला पाहिजे. रात्रीचा आहार हलकाफुलका असला पाहिजे. आपल्या आहारात बदल झाल्यास किंवा आपले जेवण भरपूर झाल्यास किंवा पित्त वाढेल अशा प्रकारचे जेवण असल्यास रात्री आपल्याला नीट झोप लागत नाही. ही समस्या कायम सुरू राहिल्यास निद्रानाशाचा रोग होतो.

औषधांचा भडिमार

अनियमित जीवनशैलीमुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात.हे आजार बरे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधे घ्यावी लागतात. यातील काही औषधांमुळे आपल्याला नीट झोप लागत नाही. औषधे दीर्घकाळ चालू राहिल्यास त्याचा परिणाम झोपेवर होतो आणि मग निद्रानाशामध्ये रूपांतर होते.

आजार आणि निद्रानाश

काही आजार आपल्याला नैसर्गिकरित्या होतात.तर काही आजार आपण आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण ओढवून घेतो.अशा आजारामुळे किंवा कायमच्या दुखण्यामुळे सुद्धा आपल्याला झोप व्यवस्थित लागत नाही. ही सवय अशीच कायम राहिल्यास निद्रानाशाचा रोग जडतो.

झोपण्याच्या सवयी

आपल्या झोपण्याच्या सवयीवरही आपली झोप व्यवस्थित लागणे किंवा न लागणे हे अवलंबून असते. झोपेचे टायमिंग नियमित नसेल तर नीट झोप लागत नाही झोपेपूर्वी मोबाईल टीव्ही यांचा अतिरेकी वापर केला आहे तर झोप नीट लागत नाही. म्हणून आपण झोपेची सवय योग्य पद्धतीने स्वतःला लावून घेतली पाहिजे. रात्री दहा वाजता झोपले पाहिजे आणि पहाटे पाच वाजता आपण जागे झालो पाहिजे.

मोबाईल टीव्ही चा अतिरेकी वापर

सध्या भारतातच काय संपूर्ण जगात मोबाईलचा अतिरेकी आणि अनावश्यक वापर होत आहे. या मोबाईलच्या अतिवापरामुळे झोपेवर परिणाम होतो. झोपण्यापूर्वी किमान तीन तास अगोदर मोबाईल किंवा टीव्ही वापरली नसली पाहिजे. जर आपण झोपेपर्यंत मोबाईल वापरत असू तर जे काही मोबाईलमध्ये पाहिले आहे किंवा टीव्ही मध्ये पाहिले आहे तेच सर्व दृश्य रात्रभर आपल्या सगळ्यांसमोर येते आणि झोप लागत नाही मग पुढे त्याचे रूपांतर निद्रानाशात होते.

निद्रानाशावर उपाय कोणते? Remedy for insomnia

*योगा आणि व्यायाम*

नियमित योगा आणि व्यायाम केल्यास रात्री चांगली झोप लागते. योगामध्ये प्राणायाम सुव्यवस्थित केल्यास रात्रीच्या वेळी शांत झोप लागते. योगा करण्यासाठी सकाळची वेळ अत्यंत चांगली; पण प्राणायाम आपण दिवसभर केव्हाही करू शकतो. जेवल्यानंतर किमान तीन तास योगा किंवा प्राणायाम करू नये. जे लोक नियमित योगा, सूर्यनमस्कार , प्राणायाम, व्यायाम करतात त्यांना निद्रानाशाची समस्या भेडसावत नाही. त्यांचे आरोग्य पण चांगले राहते.

*चालणे, फिरणे, सायकलींग करणे ,कष्टाची कामे*

ज्यांना कोणतीही कष्टाची कामे नाहीत त्यांनी दररोज पाच ते सात किलो मीटर चालले पाहिजे. एका जागेवर बसून राहणे चुकीचे आहे. आपण सतत हिंडत फिरत राहिले पाहिजे. आपल्या माणसात मित्रमंडळींच्यामध्ये मिसळून राहिले पाहिजे. कष्टाची कामे योग्य प्रमाणात केल्यास आपल्याला झोप चांगली लागते. घाम येईपर्यंत काम केले पाहिजे. ज्यांना कष्टाचे कामच नाही त्यांनी सायकलिंग करणे किंवा जलद चालणे अत्यंत चांगले असते किंवा घाम येईपर्यंत व्यायाम करणे आवश्यक आहे.

*आनंदी राहा*

आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जवळची व्यक्ती भेटल्यास किंवा मित्र मंडळी भेटल्यास त्यांचे हसतमुखाने स्वागत केले पाहिजे. याशिवाय वेगवेगळ्या माणसांची मनमोकळ्या आणि मन मुरादपणे गप्पा मारल्या पाहिजेत. त्यामुळे आपला दैनंदिन तणाव कमी होतो आणि आपल्याला निवांत झोप लागते.

*देश निहाय निद्रानाशाची टक्केवारी Country-wise insomnia percentage*

स्टॅटिस्टा कंझ्युमर इनसाइट्सच्या अहवालानुसार जगातील काही प्रमुख देशांचा सर्वे केल्यानंतर असे आढळून आले की स्वीडन या देशात निद्रानाशाची समस्या अधिक प्रमाणात आढळते. जगातील काही प्रमुख देशांमध्ये निद्रानाशाची समस्या असलेल्या लोकांची टक्केवारी पाहू.

1 स्वीडन—51%

2 पोलंड—50%

3 जर्मनी—-44%

4 फ्रान्स—-40%

5 ग्रेट ब्रिटन–37%

6 अमेरिका—36%

7 ब्राझील—-34%

8 चीन ——–22%

Leave a comment