Elon Musk kicked out of the White House-व्हाईट हाऊसने एलॉन मस्कला बाहेर काढले 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्कला व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश देऊन खूप मोठी चूक केली होती.तो अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधील प्रत्येक निर्णयांमध्ये आपला सहभाग दाखवू लागला. हे प्रमाण इतके वाढले की एक दिवस याच व्हाईट हाऊसने मस्कला व्हाईट हाऊसमधून बाहेर काढले जाणून घेऊया सविस्तर माहिती.

डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांचे संबंध: Relations of Donald Trump and Elon musk

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांचे मैत्रीचे संबंध जगप्रसिद्ध आहेत. गत निवडणुकीत मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देऊन सहकार्य केले होते. मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीत भरपूर पैसा ओतला होता. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली आणि याला मस्क यांना सत्तेमध्ये अप्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी मिळाली. विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या विजयाच्या शिल्पकारांमध्ये एलॉन मस्क यांचाही उल्लेख केला होता. अर्थात ट्रम्प आणि मस्क हे दोघेही व्यापारीच. म्हणजे उद्योगपतीच. त्यामुळे ट्रम्पने एलॉन मस्कच्या प्रत्येक उद्योगाला चालना देण्यास सुरुवात केली. या बदल्यात ट्रम्प यांना भरपूर निधी मिळू लागला.

एलॉन मस्क यांचा व्हाईट हाऊस मधील कारभारामध्ये हस्तक्षेप: Elon Musk’s interference in White House affairs

डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क हे दोघे चांगले मित्र असल्यामुळे आणि त्यांचे संबंध घनिष्ठ असल्यामुळे त्यांचा व्हाईट हाऊस मधील शिरकाव वाढला. व्हाईटहाऊस मधील अनेक निर्णयांमध्ये एलॉन मस्क भाग घेऊ लागले. नोकर कपातीच्या निर्णयामध्ये सुद्धा मस्क यांचाच सहभाग होता. अमेरिकेच्या प्रत्येक धोरणांमध्ये एलॉन मस्क हस्तक्षेप करू लागला आणि त्याचा परिणाम म्हणून लोकांच्यामध्ये म्हणजे अमेरिकन नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होऊ लागली. एवढेच नव्हे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाला सुद्धा मस्क यांचा विरोध होऊ लागला आणि त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण अमेरिकन नागरिकांमध्ये अत्यंत तीव्र प्रतिसाद उमटू लागले. साहजिकच एलॉन मस्कवरील नाराजी ट्रंप यांच्यावरही व्यक्त होऊ लागली. अमेरिकेतील राष्ट्रीय धोरणात मस्क यांच्या वाढलेल्या हस्तक्षेपामुळे अखेर व्हाईट हाऊसने एलॉन मस्क यांना घरचा रस्ता दाखवला अर्थात त्यांना व्हाईट हाऊसमधून हाकलून काढले.

भारतात अडाणींच्या बाबतीत असे घडेल काय? Will this happen to Adani in India?

ज्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांचे दोन संबंध होते, त्याचप्रमाणे मोदी आणि अडाणी यांचे घनिष्ठ संबंध आहेत. भारतातील प्रत्येक निर्णय हे अडाणी च्या हितासाठी घेतले जातात. अर्थात अमेरिकेत जे घडले त्याची भारतात पुनरावृत्ती होईल का? मोदी सरकार आपल्या निर्णयापासून अडाणी उद्योग समूहाला दूर ठेवेल का? जेव्हा मोदी सरकार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कठोर निर्णय घेईल, तेव्हा त्यात भारताचेच हित होईल. भारतीय संपत्ती उद्योगपतींच्या घशात जात आहे हे रोखले जाईल.

Leave a comment