स्पॉंडीलायसिस हा मणक्यांच्या संदर्भातील आजार आहे. मणक्यांची झीज आणि दोन मणक्यांच्यामध्ये असलेल्या कुर्च्यांची झीज हे स्पॉंडिलायसिसचे मुख्य कारण असले तरी मोबाईलच्या अतिवापरामुळे स्पॉंडिलायसिसचा त्रास कसा होतो? ते आपण पाहणार आहोत.
मोबाईल एक अत्यावश्यक सेवा- Mobile is an essential service
सध्याच्या आधुनिक जगामध्ये मोबाईल ही एक अत्यावश्यक सेवा बनली आहे. मोबाईल वगळून दैनंदिन जीवनातील अनेक घटना आपण यशस्वीरित्या करू शकत नाही. म्हणूनच मोबाईल ही एक अत्यावश्यक सेवा आहे असेच म्हणावे लागेल. दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहार, नातेवाईकांशी संपर्क साधणे, ग्रुपच्या माध्यमातून विविध कामांचे निराकरण, ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म भरणे, ऑनलाइन मीटिंग, ऑनलाइन अभ्यास करणे अशा कितीतरी गोष्टी आज आपण मोबाईलशिवाय पूर्ण करू शकत नाही. मोबाईल ही काळाची गरज आहे. हे जरी खरे असले तरी मोबाईलचा योग्य त्यावेळी आणि आवश्यक त्या ठिकाणीच वापर करणे हे आपल्या आणि आपल्या शरीराच्या हिताचे आहे. अन्यथा आपण अनेक शारीरिक आणि मानसिक आजाराला बळी पडू शकतो.
मोबाईलचा वापर आणि मानेचे स्पॉंडिलायसिस- use of mobile phones and cervical spondylosis
मोबाईलच्या अतिवापरामुळे आणि मोबाईलचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे मान दुखण्याचा त्रास होऊ शकतो. यालाच आपण मानेचे स्पॉंडिलायसिस असं म्हणतो. मानेच्या मणक्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे मानदुखी आणि खांदेदुखीचा त्रास होतो. हा बिघाड मुख्यतः मान वाकवून मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे होऊ शकतो. आपण जेव्हा मान वाकवतो किंवा मान झुकलेली असते तेव्हा आपल्या मानेवर डोक्याचे ओझे अधिक पडते आणि मानेचा त्रास होऊ लागतो. मान खूपच वाकवून ज्यांना मोबाईलचा वापर करण्याची सवय असते, त्यांच्या मानेवर साधारणतः सुमारे 25 किलो वजनाचा भार पडतो. त्यामुळेच मानदुखीचा त्रास होतो.
मान झुकल्यामुळे त्रास का होतो? Why does bending the neck cause pain?
आपण ताठ मानेने चालत असेल किंवा ताट मान ठेवून मोबाईलचा वापर करत असेल तर निश्चितच आपल्याला मानेचा कोणताही त्रास होणार नाही. याचे कारण म्हणजे आपली मान शून्य अंशामध्ये झुकलेली असेल म्हणजेच अजिबात न झुकलेल्या अवस्थेत असेल तर आपल्या मानेवर साधारणतः केवळ पाच किलोचे वजन पडलेले असते. अर्थात या वजनाचा आपल्या मानेला कोणताही त्रास होत नाही. म्हणूनच ताठ मानेने जगा असे म्हटले जाते, त्याचे हे एक मुख्य कारण आहे. आपली मान ताठ राहील याकडे नेहमीच लक्ष दिले पाहिजे. अनेकांना मान झुकवून मोबाईलमध्ये बघण्याची सवय असते
त्याचा परिणाम आपण मानेचे दुखणे ओढवून घेतो.
आपली मान केवळ 15 अंशाने जरी झुकली असेल तरी मानेवर साधारणतः 12 ते 13 किलो वजन पडते. अर्थात हे वजन मानेला न पेलवणारे आहे. मग याचे परिणाम म्हणून आपल्याला मानेचे आणि खांद्याचे अनेक विकार जडण्यामध्ये होते. आपल्याला मान झुकवल्यानंतर लगेच त्रास जाणवत नाही. पण हीच सवय कायम ठेवल्यानंतर हळूहळू मानेचा आणि खांद्याचा त्रास व्हायला सुरुवात होते.
आपली मान साधारणतः 30° ने झुकलेली असेल तर मानेवर 17 ते 19 किलोग्रॅमचे वजन पडलेले असते. एवढे वजन मानेचे मणके कसे पेलू शकतील? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? आपल्या सवयीतच आपले आरोग्य लपलेले आहे . असे म्हटले जाते ते याच कारणामुळे.
काही लोकांना खूपच वाकून मोबाईल मध्ये पाहण्याची सवय असते. अशा लोकांची मान साधारणतः 60° पर्यंत झुकलेली असते. जेव्हा आपली मान साठ वर्षांपर्यंत झुकलेली असते,तेव्हा मानेवर साधारणतः 25 ते 28 किलोग्रॅम चे वजन पडलेले असते. आपल्या मानेला पाच किलोग्रॅम पेक्षा जास्त वजन पडलेले सहन होत नाही. मग 28 किलोग्रॅम चे वजन वारंवार मानेवर पडत असेल तर त्या मानेचे काय हाल होईल, याची कधी कल्पना केली आहे का? म्हणूनच मोबाईल वापरकर्त्यांना मानदुखीचा ,पाठदुखीचा , खांदेदुखीचा त्रास होत असल्याचे दिसून आलेले आहे. अर्थात मोबाईलचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे हा मानेचा त्रास होतो. यालाच मानेचे स्पॉंडिलायसिस असेही म्हटले जाते.
स्पॉंडीलायसिसवर उपाय काय ? What is the solution to spondylosis?
कोणताही आजार झाल्यावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून जर आपण योग्य काळजी घेतली तर निश्चितच त्या आजारापासून आपण दूर राहू शकतो. स्पॉंडीलायसिस हा आजार असाच आहे, की हा आजार होऊ नये म्हणून योग्य ती दक्षता घेतल्यास त्रास होणार नाही.
आपण मोबाईलचा वापर करताना नेहमी मान ताठ राहील म्हणजेच शून्य अंश सेल्सिअस मध्ये मान राहील तेव्हा आपल्याला अजिबात त्रास होणार नाही.
आपण खुर्चीवर बसून मोबाईलचा किंवा लॅपटॉपचा वापर करत असताना खांदे, मान, पाठ सैलसर ठेवावेत. त्यामुळे मानेवर किंवा खांद्यांवर आणि पाठीवरही ताण पडणार नाही. खुर्चीवर एकाच वेळी अधिक तास बसण्यापेक्षा अधून मधून उठत राहावे. एक दोन मिनिटे चालून परत खुर्चीवर बसावे. असे केल्याने स्नायू सैलसर राहतात आणि मग मानेचा किंवा खांदे दुखीचा आणि पाठदुखीचा त्रास होणार नाही. आपल्याला वेळ मिळाल्यास बैठे काम करणाऱ्यांनी अधून मधून स्ट्रेचिंग करावे. त्याचा फायदा अधिक होतो.
पाठ दुखीवर, मान दुखीवर, खांद्याच्या दुखण्यावर कोणत्याही प्रकारचा मलम, जेल, स्प्रे यांचा वापर करून आजार पूर्णतः कधीच बरा होणार नाही. किंवा हा त्रास कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या गोळ्या खाऊन आजार पूर्णतः बरा होणार नाही. अँटिबायोटिक गोळ्या खाल्ल्यामुळे किंवा मसल रिलॅक्सनच्या गोळ्या खाल्ल्यामुळे आपल्याला तात्पुरते बरे वाटते. गोळ्या संपल्यावर पुन्हा दुखण्याचे प्रमाण वाढते. म्हणूनच मानदुखीपासून किंवा पाठदुखीपासून कायमची मुक्तता मिळायची असेल, तर आपल्या सवयीत बदल करणे आवश्यक आहे आणि व्यायामातही सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. अशा प्रकारे तुम्ही दक्षता घेतली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या स्पॉंडीलायसिस त्रास होणार नाही.