आपण जेव्हा Onion चिरतो तेव्हा कांद्यातून विशिष्ट प्रकारची संयुगे बाहेर पडतात. त्या संयुगांना लॅक्रिमेटर संयुगे असे म्हणतात. या लक्रिमेटर संयुगांमुळे डोळ्यांतील नसांमध्ये जळजळ निर्माण होते आणि त्यामुळे डोळ्यांतून पाणी येते.
लॅक्रिमेटर संयुगे ही अमिनो आम्लाचा एक भाग असतात. यामध्ये प्रामुख्याने मेथिओनाईन आणि सिस्टीन या संयुगांचा समावेश असतो. हीच संयुगे डोळ्यांमध्ये जळजळ निर्माण करतात आणि त्यामुळे डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. जेव्हा कांदा कापला जातो तेव्हा ही संयुगे हवेत सोडली जातात.
तेव्हा असे होते की एंजॉईन या अमिनो आम्लाचे लॅक्रिमेटर संयुगामध्ये बदलण्याचे काम होते. आणि त्यामुळेच डोळ्यांतील नसांना त्रास होतो आणि डोळ्यांतून पाणी यायला सुरुवात होते.
कांदा चिरताना डोळ्यांतून पाणी येऊ नये म्हणून काय करावे? What to do to prevent watery eyes while chopping onion?
कांदा चिरण्यापूर्वी फ्रीजमध्ये ठेवल्यास आणि तो थंडगार अवस्थेतील कांदा चिरल्यास आपल्या डोळ्यांना कोणताही त्रास होत नाही. कारण कांद्यातील आम्ले गोठलेली असतात.त्यामुळे ती हवेत फेकली जात नाहीत. याशिवाय कांदा चिरताना दुसरा उपाय म्हणजे डोळ्यांवरती गॉगलचा वापर करणे. गॉगलचा वापर केल्यास हवेत मिसळलेल्या अमिनो आम्लांचा त्रास डोळ्यांना होणार नाही आणि डोळ्यांमध्ये जळजळ होऊन डोळ्यातून पाणी येणार नाही.