25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी आणली होती. सध्याचे महाराष्ट्रातील विद्यमान सरकार 25 जून हा दिवस संविधानात हत्या दिन म्हणून का साजरा करते? याबाबत आपण सविस्तर चर्चा करू.
भारतात आणीबाणी लागू करण्यापूर्वी इंदिरा गांधींनी कणखर भूमिकेने घेतलेले निर्णय- Tough decisions taken by Indira Gandhi before imposing Emergency in India
1971 मध्ये इंदिरा गांधी भारताच्या दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या होत्या. याच दरम्यान पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यात अंतर्गत कलह निर्माण झाला होता. पूर्व पाकिस्तानच्या विनंतीवरून इंदिरा गांधींनी हस्तक्षेप करून पश्चिम पाकिस्तानचा काटा काढला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. यावेळी अमेरिकेने पाकिस्तानच्या अंतर्गत मामल्यात दखल देऊ नका,असे सुनावले होते. इंदिरा गांधींनी अमेरिकेचे अजिबात ऐकले नाही. किंवा त्यांचा तसूभरही दबाव घेतला नाही. त्या युद्धात भाग घेऊन पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांगलादेश हा नवीन देश हउदयाला आणण्यास इंदिरा गांधी कारणीभूत ठरल्या. त्यामुळे जगामध्ये त्यांची प्रतिमा उंचावली गेली.
1972 सालापर्यंत पॉंडेचरी हा भाग फ्रान्सच्या ताब्यात होता. तो भाग इंदिरा गांधींनी भारतात सामील करून घेतला. पॉंडेचरीमधील फ्रान्सची सत्ता संतुष्टात आणली.
1974 मध्ये इंदिरा गांधी यांनी आणखी एक क्रांतिकारी पाऊल टाकले .1974 च्या बुद्ध जयंतीच्या दिवशी इंदिरा गांधींनी राजस्थानच्या वाळवंटात अणुचाचणी घेतली आणि भारत हा आण्विक देश आहे हे जगाला सिद्ध करून दाखवले.
भारताचा समावेश आण्विक राष्ट्रांमध्ये झाल्यामुळे भारताकडे एक कणखर देश म्हणून जग पाहू लागले. अर्थात ही गोष्ट अभिमानास्पद अशीच होती;पण भारतातील विरोधकांना या सर्व गोष्टी खटकल्या. इंदिरा गांधी यांनी उचललेल्या पावलांमुळे इंदिरा गांधी आपली सत्ता कधीच सोडणार नाहीत. असे विरोधकांना वाटले आणि इंदिरा गांधी यांच्या सरकार विरोधात असंतोष फैलावण्याचे काम त्यावेळी विरोधकांनी केले. जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेचा संप घडवून आणला. देशात वेगवेगळ्या मार्गाने असंतोष फैलावण्याचं काम विरोधकांकडून चालू होते आणि म्हणूनच 25 जून 1974 रोजी इंदिरा गांधी यांना आणीबाणी जाहीर करावी लागली.
1975 च्या आणीबाणीचे समर्थन कोणी केले? Who supported the Emergency of 1975?
भारतामध्ये आणीबाणी जाहीर झाल्यावर त्याचे पहिले समर्थन भारताची आय बी महत्त्वाची संघटना यांनी केले. त्याचबरोबर आचार्य विनोबा भावे यांनी आणीबाणीचे स्वागत केले. आणीबाणी जाहीर झाल्यावर विनोबा भावे म्हणाले की, अब अनुशासन के पर्व शुरू हो रहा है! याचा अर्थ आता भारतात शिस्त निर्माण होईल या अर्थाने विनोबा भावेंनी असे उद्गार काढले होते. महाराष्ट्राचे तत्कालीन नेते बाळासाहेब ठाकरे यांनीही आणीबाणीचे स्वागत केले होते. त्यांनी इंदिरा गांधींना जाहीर पाठिंबा दिला होता. भारतात शिस्त निर्माण करण्यासाठी आणीबाणी आवश्यक असल्याचे बाळासाहेब ठाकरे यांनी आपली मत व्यक्त केले होते. अशा प्रकारे भारतातील अनेक प्रमुख नेत्यांनी आणीबाणीचे स्वागत केले होते. आरएसएस या संघ प्रणित संघटनेने सुद्धा आणीबाणीचे स्वागत केले होते; पण भारताची सत्ता हवे असणाऱ्या लोकांनी म्हणजे विरोधी पक्षांनी आणीबाणीचा विपर्यास करून जनतेत असंतोष पसरवण्याचे काम केले.
आणीबाणी काळातील 20 कलमी कार्यक्रम :20-point program during the Emergency 1975
1 राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
2 बचतगट स्थापन करून महिला व दुर्बल घटकातील लोकांचा विकास करणे.
3 भूमिहीन शेतमजुरांना पडीक जमीन वाटप करणे.
4 शेतमजुरांसाठी किमान वेतन अंमलबजावणी
5 कसेल त्याची जमीन या कायद्यानुसार अनेक शेती कसत असणाऱ्या शेतकऱ्यांना जमीनदाराकडून जमीन काढून घेऊन दिली.
6 अन्न सुरक्षा कायदा.
अ सामाजिक वितरण व्यवस्था
ब अंत्योदय अन्न योजना.
7 इंदिरा आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील गरीब लोकांना घर बांधून देणे.
8 शहरी भागातील EWC/LIG लोकांना घरे.
9 ग्रामीण भागात जलद पाणीपुरवठा.
10 लहान मुलांचे लसीकरण.
11 ग्रामीण भागातील स्वच्छता अभियान
12 अनुसूचित जातीच्या,जमातीच्या कुटुंबांना मदत.
13 कार्यात्मक अंगणवाड्या.
14 वृक्षारोपण
15 अपंग, अनाथ मुलांचे कल्याण
16 वृद्धांचे कल्याण.
17 ग्रामीण रस्ते
18 वीजपुरवठा .
19 कुटुंब नियोजन
20 अशा विविध सर्वंकष योजना इंदिरा गांधींनी आणीबाणी काळात प्रभावी अंमलात आणल्या.
आणीबाणी काळातील धरपकड: Emergency situation
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1971 नंतर अनेक धाडसी निर्णय घेतल्यामुळे विरोधकांना आपल्याकडे कधीच सत्ता येणार नाही अशी भीती वाटत होती आणि त्यातूनच इंदिरा गांधी यांनी पुकारलेल्या आणीबाणीविरूद्ध असंतोष व्यक्त करत होते. त्यामुळे आणीबाणीविरूद्ध असंतोष पसरवणाऱ्या लोकांना आणि नेत्यांना इंदिरा गांधींनी धरपकड करण्यास सुरुवात केली होती. जयप्रकाश नारायण यांनी तर मलाही फॅसिस्ट समजा, असे म्हटले होते. या सर्व परिस्थितीमुळे अनेक विरोधी नेते मंडळींना आणि आरएसएसच्या नेत्यांना तसेच आरएसएसच्या तत्कालीन अध्यक्ष बाळासाहेब देवरस यांना अटक करून तुरुंगात टाकले होते; पण त्यांना कोणत्याही प्रकारची वाईट वागणूक न देता राज कैद्या सारखी वागणूक दिली होती. अटल बिहारी वाजपेयी तर आजारपणाचा अर्ज देऊन दवाखान्यात ॲडमिट झाले होते. संघाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी माफीनाने सुरू केले होते. आणि आपली सुटका करून घेण्यास सुरुवात केली होती. संघाचे तत्कालीन अध्यक्ष बाळासाहेब देवरस यांनी तर दोन-तीन वेळा इंदिरा गांधींना पत्र लिहून आणीबाणीचे आम्ही स्वागत करत आहोत असे सांगितले होते.पण इंदिरा गांधींनी त्यांच्या कोणत्याही पत्राला उत्तर दिले नाही. शेवटी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब देवरस यांनी विनोबा भावे यांना पत्र लिहिले आणि संघावरील बंदी उठवण्याची विनंती केली .अशा प्रकारे संघाने आणीबाणीच्या काळातही अप्रत्यक्षपणे आणीबाणीला सहयोग देऊन आपली सुटका करून घेतली होती. पण आज हेच संघप्रणित प्रशासन आणीबाणीचा काळा दिवस साजरा करत आहे याहून दुर्दैव ते काय?
संविधान हत्या दिन: एक चेष्टा
सध्याच्या विद्यमान सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 25 जून हा संविधान हत्या दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे यासारखे दुर्दैव कोणते ? महाराष्ट्र सरकारच्या पब्लिसिटी डिपार्टमेंटने 25 जून 2025 रोजी प्रसिद्धी पत्रकातून संविधान हत्या दिवस साजरा केला आहे. खरं तर संविधानाची हत्या सध्या कोण करत आहे हे जाणकार भारतीय मंडळींना चांगलेच माहीत आहे; पण आरएसएस प्रणित हे सरकार कांगावा करून भारतीय अज्ञानी जनतेचा गैरफायदा घेत आहे. भारतीय जनतेने जागृत होऊन 1975 च्या आणीबाणीचा आणि सध्या गेल्या अकरा वर्षात अघोषित चालू असलेल्या आणीबाणीचा अभ्यास करावा. विवेकबुद्धीने काम करावे. हीच वेळ आता भारताला वाचू शकते. नाहीतर आरएसएस प्रणित सरकार असेच काहीतरी टुम काढून लोकांची दिशाभूल करत राहणार आणि आपली सत्ता टिकवत राहणार.