Difference between baking powder and baking soda-बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यातील नेमका फरक काय?

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यांमध्ये सूक्ष्म फरक आहे. वरवर पाहता हे दोन्ही पदार्थ एकच आहेत असे वाटते; पण प्रत्यक्षात त्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत आणि त्यांचा उपयोगही वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो. त्या दोन्हीही पदार्थांची ओळख आपण करून घेऊ.

बेकिंग सोडा [धुण्याचा सोडा] :Baking soda

बेकिंग सोड्यालाच धुण्याचा सोडा असे म्हणतात. बेकिंग सोडा प्रामुख्याने कपडे धुण्याच्या प्रक्रियेत वेगवेगळ्या वॉशिंग पावडर मध्ये वापरला जातो. शिवाय फरशी स्वच्छ करण्यासाठी सुद्धा बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. या बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव सोडियम कार्बोनेट असे आहे. रासायनिक रेणुसूत्र हे Na2CO3 असे आहे.

बेकिंग पावडर [खाण्याचा सोडा] Baking powder

बेकिंग पावडर प्रामुख्याने खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाते. तसेच तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी वेगवेगळ्या टूथपेस्टमध्ये बेकिंग पावडरचा वापर केला जातो. बेकिंग पावडरलाच खाण्याचा सोडा असे म्हणतात. बेकिंग पावडरचे रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट असे आहे. यालाच सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असेही म्हणतात. या बेकिंग पावडरचे रासायनिक रेणुसूत्र NaHCO3 असे आहे .

बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा यामध्ये सूक्ष्म फरक आहे. तो आपण लक्षात घेतल्यास आपला गोंधळ होणार नाही.

Leave a comment