महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील महाबळेश्वरच्या जोर परिसरातील कृष्णा नदीच्या अगदी उगमाजवळील खळाळत्या पाण्याचे हे दृश्य आहे. महाबळेश्वरच्या घाटमाथ्यावर कृष्णा नदीचा उगम झाला असे म्हटले जाते;पण प्रत्यक्षात कृष्णेचा उगम हा जोर या गावापासून काही अंतरावरच आहे. हा उगम प्रवाह महाबळेश्वरच्या घाट माथ्यावरून येणाऱ्या अनेक प्रवाहांपेक्षा खूप मोठा प्रवाह आहे. म्हणूनच कृष्णेचे उगमस्थान हे जोर गावापासून काही अंतरावर आहे हेच सत्य आहे. कृष्णा नदीचे शुद्ध आणि स्वच्छ पाणी पिण्याचा मोह नक्कीच होतो.कृष्णेची ही उगमस्थानची नदी अरुंद आणि दगड गोट्यांनी व्यापलेली आहे. या दगडोट्यातून कृष्णेचे पाणी खळाळून वाहत आहे .दृश्य पावसाळ्यातील जुलै महिन्यातील आहे.
आज दिनांक 02 जुलै 2025 रोजी कृष्णेचे उगमस्थान प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद लुटता आला.