Neeraj Chopra-नीरज चोप्राने जिंकली डायमंड लीग स्पर्धा, पण.

भारताचा स्टार खेळाडू गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने जर्मनीतील पॅरिस येथे सुरू असलेल्या डायमंड लीग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून भारताचा मान कायम राखला आहे. नीरज चोप्राने दोन वेळा ऑलिंपिक पदके मिळवलेली आहेत. एक वेळा सुवर्णपदक आणि एक वेळा सिल्व्हर पदक मिळवलेले आहे. ऑलिंपिकमध्ये यश मिळवल्यानंतर गोल्डन बॉय नीरज चोप्राचा भाला अपेक्षित दूर जात नाही असे आढळून आलेले आहे. तरीसुद्धा डायमंड लीग स्पर्धा जिंकून नीरज चोप्राने पुढील ऑलिंपिक स्पर्धेतील आपले आव्हान कायम असल्याचे सिद्ध केले आहे.

नीरज चोप्राचे ऑलिंपिक स्पर्धेतील यश Neeraj Chopra’s Olympic success

2020 च्या ऑलिंपिक स्पर्धेत नीरज चोप्राणे सुवर्णपदक पटकावून भारताला भालाफेक मध्ये प्रथमच सुवर्णपदकाचा मान मिळवून दिला आहे. 2024 च्या ऑलिंपिक स्पर्धेत मात्र नीरज चोप्राला अपेक्षित यश मिळाले नाही. तरीसुद्धा त्याने रौप्य पदक पटकावून ऑलिंपिक पदकाचा मान कायम टिकवला आहे. 2028 च्या ऑलिंपिक स्पर्धेत यश मिळवण्यासाठी नीरज चोप्राला खडतर प्रयत्न करणे आवश्यक आहे. 2025 च्या डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राने 88.16 मीटर भाला फेकलेला आहे. ही कामगिरी ऑलिंपिक स्पर्धेसाठी पुरेशी नाही. त्यासाठी त्याने 90 मीटर पेक्षा जास्त दूर भाला फेकला पाहिजे किंवा 95 मीटर पेक्षा जास्त भालाफेक जेव्हा नीरज चोप्रा करेल तेव्हा 2018 च्या ऑलिंपिक स्पर्धेत नीरज चोप्राचे सुवर्णपदक निश्चित झालेले असेल.

Leave a comment