Sudden heart attack due to corona vaccine? कोरोना लसीने अचानक हृदयविकार?

सध्या भारतात अनेक धडधाकड तरुणांमध्ये आणि प्रौढ व्यक्तींच्या मध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. ही स्थिती संपूर्ण भारतातच असल्याने याबाबत केंद्रशासनाने संशोधन समिती नेमणूक अहवाल सादर केला. पण हा अहवाल कितपत सत्य आहे ? अन्य काही देशांमध्ये सुद्धा कोरोना लसीबाबत काय निष्कर्ष काढले? याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊया.

भारतात अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचे प्रमाण वाढले. Sudden increase in deaths due to heart attacks in India

भारतात मार्च 2020 मध्ये covid-19 या नावाने कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आणि बघता बघता ते सर्व भारतभर पसरले. 23 मार्च 2020 रोजी भारतामध्ये लॉकडाऊन जाहीर केले. सर्वसाधारणपणे 2020 मध्ये भारतात कोरोनाचे प्रमाणे होतेच;पण कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण हे मे 2020 ते सप्टेंबर 2020 मध्ये आढळले आणि भारतात अक्षरशः मृत्यूचे तांडव पसरले. त्यानंतर कोरोनाची लस भारताने निर्माण केली. ती अन्य देशांनाही विकली गेली. संपूर्ण भारतात दोन टप्प्यात कोरोनाची लस संपूर्ण भारतीयांना भारतीय बनावटीची ही लस देण्यात आली. पुढे हळूहळू कोरोना निघून गेला; पण 2021 नंतर मात्र भारतात अचानक हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढू लागले.

अचानक मृत्यूचे प्रमाण कोणत्या वयोगटातील आढळत आहे?

भारतात कोरोना नंतर दोन वर्षातच अचानक हृदयविकार होऊन धाडकन खाली पडून मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामध्ये तरुण लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. प्रौढ लोकांचेही प्रमाण लक्षवेधी आहे.वृद्ध लोकांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला तरी एवढे कोणी गांभीर्याने घेतले नाही;पण तरुण मुले अचानक मृत्युमुखी पडतात तेव्हा शंका बळावत चालली. कोणी भाषण करताना, कोणी नृत्य करताना, कोणी चालत असताना, कोणी बोलत असताना,कोणी ऑफिसमध्ये काम करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका येतो आणि तात्काळ मृत्यू होतो. असे प्रमाण भारतात मोठ्या प्रमाणात वाढले आहे .त्यामुळे कर्नाटक सरकारने पहिल्यांदा या मृत्यूबाबत आक्षेप नोंदवलेला आहे आणि कर्नाटक सरकारच्या या अक्षरामुळे केंद्र सरकारला खास समिती नेमावी लागली आहे.

कर्नाटक सरकारचा अहवाल

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की मे 2025 मध्ये कर्नाटकातील हासन जिल्ह्यात 20 हून अधिक तरुणांचा अचानक हृदयविकारामुळे मृत्यू झाला आणि ही बाब अतिशय गंभीर आहे. या पाठीमागे कोरोना लसीचे तर कारण नाही का? याबाबत संशोधन करण्याची गरज असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपले मत व्यक्त केले. अर्थात ही स्थिती केवळ कर्नाटका पुरती मर्यादित नाही तर महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये हे मृत्यू कोरोना लसीमुळे तर होत नाहीत ना ? अशा प्रकारची शंका निर्माण होत आहे.

वैद्यक शास्त्रज्ञांचा अहवाल

जागतिक पातळीवरील अनेक वैद्यक शास्त्रज्ञांनी हृदयविकाराच्या मृत्यूबाबत अभ्यास केल्याचे आढळून आले आहे आणि त्या शास्त्रज्ञ हा मृत्यू कोरोनाच्या लसीमुळे झालेला असल्याचा अहवाल ही सादर केलेला आहे पण याबाबत सोसिअल मीडियामध्ये खूप चर्चा न झाल्यामुळे या गोष्टी अनभिज्ञ राहिल्या आहेत.

आय सी एम आर, ए एम्सच्या अभ्यासातील निष्कर्ष

कोरोना लसीकरण आणि हृदयविकाराने होणारे मृत्यू यांचा काहीही परस्पर संबंध नाही असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच आयसीएमआर आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने म्हणजेच ए एम केलेल्या अभ्यासातून निष्पन्न झाल्याचे केंद्र सरकारने बुधवारी सांगितले आहे. पण या गोष्टीवर देशातील जनता कितपत विश्वास ठेवेल हेही महत्त्वाचे आहे. कारण भारत सरकारनेच लसीकरण काढले होते आणि त्या लसीकरणाचा परिणाम होतो म्हणून जर हृदयविकार होत असतील तर भारत सरकारच्या अखत्यारीतील कोणतीही संस्था निगेटिव्ह निष्कर्ष कशी काय काढू शकेल ?या बाबींचा सरकारवर मोठा परिणाम होईल, याचीही सरकारला जाणीव आहे. त्यामुळे निष्पक्षपातीपणे काम करणाऱ्या एखाद्या सामाजिक संस्थेकडे हे काम दिले पाहिजे म्हणजे लोकांचा त्यावर विश्वास बसेल आणि कोरोनामुळेच किंवा कोरोनाच्या लसीकरणामुळेच लोकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे ही भीती लोकांच्या मनातून जाईल.

Leave a comment