अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल 2025 च्या पहिल्या आठवड्यात टॅरिफ कर वाढवण्याचा निर्णय घेतला आणि जगात एकच खळबळ माजली. त्यानंतर त्यांनी हा निर्णय काही काळ (तीन महिने)स्थगित केला होता. तीन महिन्यानंतर आठ जुलै 2025 रोजी टॅरिफ वाढीचा निर्णय घेतला. या निर्णयाचा कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा होणार? त्याची आपण सविस्तर माहिती घेऊ.
14 देशांना टॅरिफ वाढीचा फटका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिका फर्स्ट या त्यांच्या जाहीरनाम्यावरच निवडून आलेले आहेत आणि त्याचाच हा परिणाम म्हणजे टॅरिफ वाढीचा कर होय. या टॅरिफ वाढीचा फटका जगातील चौदा देशांना बसणार आहे. हा कर 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहे. हे 14 देश कोणते हे संपूर्ण जगाला कळायला हवेत. ते 14 देश आणि त्यांना लावलेला टॅरिफ कर पुढीलप्रमाणे आहे. बोस्निया 30%, हल्लेखोरांना 30%, सर्बिया 35%, कझाकिस्तान 25%,बांग्लादेश 35%, दक्षिण कोरिया 25 %, लाओस 40%, ट्युनिसिया 25%, दक्षिण आफ्रिका 30%, जपान 25%, 36 %, कंबोडिया 36% म्यानमार [ ब्रह्मदेश] 40%, थायलंड 36%, मलेशिया 25%, इंडोनेशिया 32% इत्यादी होय. या टॅरिफ वाढीचा सर्वात जास्त फटका म्यानमार, बांग्लादेश, कंबोडिया, लाओस, सर्बिया, थायलंड इत्यादी देशांना बसणार आहे. या टॅरिफ वाढीतून भारत या देशाला वगळले आहे. अमेरिकेच्या या नव्या धोरणामुळे जगात चांगलीच खळबळ माजली आहे. विशेषतः या चौदा देशांमध्ये टॅरिफ वाढीचा चांगलाच फटका बसणार आहे. येथील शेअर मार्केटमध्ये सुद्धा परिणाम होणार आहे.
टॅरिफमधून भारताला वगळले- भारतीय शेअर मार्केट तेजीत जाणार
1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणाऱ्या टॅरिफ वाढीचा फटका जगातील चौदा देशांना बसणार असला तरी या टॅरिफ वाढीतून भारताला वगळल्यामुळे भारतात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम नक्कीच भारतीय शेअर मार्केटवर होणार असून भारतीय शेअर मार्केट चांगलाच सुधारणार असल्याची चर्चा सर्वत्र चालू आहे. असे झाल्यास भारतीय व्यापाराला गती येईल.
अमेरिकेची जगाला धमकी
अमेरिकेने टॅरिफ वाढ करून जगाला एक प्रकारची धमकीच दिली आहे. आम्ही टॅरिफ वाढ केला म्हणून तुम्हीही वाढ केल्यास येथून पुढे आणखी 25% अधिक कर लागू केला जाईल.अशा प्रकारची धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे.
म्यानमार आणि लाओस या दोन देशांना सर्वात जास्त टॅरिफ कर लावून अमेरिकेने या दोन देशांना चांगले अडचणीत आणले आहे. या टॅरिफ वाढीचा परिणाम काय होईल? अमेरिकेतील जनतेच्या भावना काय असतील? त्या बाबतीत लवकरच चित्र स्पष्ट होईल.