पाळीव प्राण्यांपैकी मांजर, कुत्रा हे सर्वांचेच आवडते पाळीव प्राणी आहेत. पण असे पाळीव प्राणी घरात पाळण्यामध्ये आपल्याला कोणते धोके आहेत हे पण माहीत असणे गरजेचे आहे. पाळीव प्राण्यांपासून माणसाला अनेक प्रकारचे संसर्गजन्य रोग होतात. मांजर या प्राण्यांपासूनही आपल्याला अनेक धोके आहेत. त्याची आपण थोडक्यात माहिती करून घेऊ.
पाळीव प्राणी
जे प्राणी आपण आपल्या घरामध्ये, गोठ्यामध्ये, वाड्यामध्ये पाळतो , अशा प्राण्यांना पाळीव प्राणी म्हणतात . मांजर, कुत्रा, गाय ,बैल, म्हैस, घोडा, गाढव, कोंबड्या ,बदक इत्यादी अनेक प्रकारचे प्राणी माणूस पाळत असतो. या प्राण्यांपासून माणसाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचे आजार होऊ शकतात. म्हणूनच या प्राण्यांपासून सावध राहणे आवश्यक आहे.
मांजर हा पाळीव प्राणी
वाघ , बिबट्या, चित्ता या सर्व प्राण्यांना मार्जार कुळातील प्राणी असे म्हटले जाते. या मार्जार कुळातील सर्वात लहान प्राणी म्हणजे मांजर होय. मांजर हे माणसांमध्ये लवकर मिसळते. घरामध्ये त्याचे वास्तव्य असते. त्याच्या केसांचा स्पर्श मऊसर असतो. आणि ते आपल्या पायांमध्ये नेहमी लुडबूड करत असते. त्यामुळे मांजर सर्वांना हवेहवेसे वाटत असते.
माणूस मांजर हा प्राणी का पाळतो?
माणसाने अनेक प्राण्यांना पाळीव प्राणी बनवले आहे. हे प्राणी पाळीव बनवताना माणसाने त्याची उपयुक्तता पाहिली आहे.मांजर हा प्राणी सुद्धा माणसाने पाळीव प्राणी म्हणून त्याची ओळख निर्माण केली आहे. शेतकरी कुटुंबात घरामध्ये धनधान्य असते. या धान्याचे नुकसान उंदीर मोठ्या प्रमाणात करत असतात. उंदरांपासून धान्याचे संरक्षण करण्यासाठी माणूस मांजर पाळू लागला आणि हळूहळू मांजर हे एक शेतकरी कुटुंबातील माणसांचा अविभाज्य घटक बनला. पुढे अनेक माणसे घरात मांजर पाळू लागले. आवड म्हणून अनेक माणसे मांजरे पाळतात आणि त्याचा आपल्याला लळा लागत असतो.पण मांजरापासून काही धोके निर्माण होतात.तेच धोके आपण आज पाहणार आहोत.
मांजरांपासून माणसाला होणारे रोग
मांजर हे दिसायला सुंदर, आकर्षक असते. त्यामुळे त्याचा आपल्याला सहज लळा लागतो.मग आपण अशी मांजरे घरामध्ये पाळतो; पण याच मांजरांपासून माणसाला अनेक प्रकारचे संसर्गजन्य रोग होतात. त्यामध्ये पोटदुखी, दमा,गर्भपात यासारखे आजार माणसाला होतात. त्याचबरोबर मांजर चावले तर रेबीज सारखा भयानक आजार सुद्धा माणसाला होऊ शकतो. म्हणूनच मांजरापासून नेहमी सावध असले पाहिजे किंवा घरात मांजर पाळले असल्यास त्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे.आपण नेहमी दक्ष असले पाहिजे.स्वच्छता,टापटीपणा खूप आवश्यक आहे.
मांजरापासून संसर्गजन्य आजार कसे होतात?
मांजराचे केस मोठ्या प्रमाणात गळत असतात. हे केस अन्नपदार्थावाटे मानवी शरीरात गेल्यास पोटदुखीसारखे आजार होतात. त्यामुळे वारंवार पोटाच्या तक्रारी होतात त्याच बरोबर मांजराचे केस श्वासनलिकेतून फुफ्फुसात गेल्यास आपल्याला दम्यासारखा भयानक आजार होऊ शकतो. गर्भवती स्त्रियांना तर मांजरांपासून अनेक धोके असतात. मांजराचे केस पोटात गेल्यास स्त्रियांचा गर्भपात ही होऊ शकतो. म्हणून मांजरांच्या केसांपासून आपण नेहमी सावध असले पाहिजे. याशिवाय मांजराला ज्या ताटातून किंवा थाळीतून जेवण दिले जाते, त्या ताटात मांजराची लाळ चिकटलेली असते. अशी थाळी घरामध्ये इतर कामासाठी वापरू नये.कारण या लाळेतून अनेक प्रकारचे जंतू आपल्या शरीरात जाऊ शकतात आणि पोट दुखी, दमा, गर्भपात ,सांधेदुखी यासारखे आजार होऊ शकतात.या आजारांचे वैशिष्ट्य म्हणजे हे आजार लवकर निदान होत नाहीत आणि मग उपचार करणे खूप अवघड जाते. म्हणून मांजरांपासून नेहमी दूर असावे.किचनमध्ये किंवा घरातील इतर ठिकाणी त्याचा वावर न ठेवता मांजरासाठी स्वतंत्र खोली असायला हवी.
रेबीज
रेबीज उपचार न केल्यास कधीच बरा न होणारा आजार आहे. आणि त्याचे परिणाम म्हणजे माणसाचा मृत्यू होतो. रेबीज हा रोग मुख्यतः कुत्रा, मांजर, ससा, माकड इत्यादी प्राणी चावल्यामुळे माणसाला किंवा अन्य कोणत्याही प्राण्याला होतो. मांजर चावल्यामुळेसुद्धा रेबीज हा आजार होतो. मांजर चावल्यानंतर रेबीज प्रतिबंधक लस न घेतल्यास काही दिवसातच माणसाचा मृत्यू होतो. म्हणून मांजरांपासून आपण नेहमी सावध असायला हवे.मांजर पायात घुटमळते त्यावेळी लाडात येऊन ते आपल्याला चावू शकते. आणि अशावेळी आपण जर दुर्लक्ष केले तर रेबीजसारखा भयानक आजार होतो. हा आजार एकदा जडला की माणसाचा मृत्यू निश्चितच होतो. हा आजार झाल्यानंतर बरा होत नाही. म्हणून मांजर पाळणाऱ्या माणसाने हे नेहमी लक्षात ठेवायला हवे.