12 जून 2025 रोजी दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी अहमदाबाद येथून उड्डाण केलेल्या विमानाचा काही सेकंदातच अपघात झाला. या अपघाताचा ए ए आय बी च्या पथकाने पायलटवर ठपका दिला आहे. तो काय आहे नेमका ठपका? यामध्ये कितपत सत्यता आहे ?जाणून घेऊया अधिक माहिती.
ए आय 171 या ड्रीमलायनर विमानाचा अपघात
12 जून 2025 रोजी दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी उड्डाण केलेल्या 171 या ड्रीमलाइनर विमानाचा अपघात झाला आणि या विमान दुर्घटनेमध्ये 242 प्रवाशांसह 260 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ए ए आय बी च्या तपासणी पथकाने हा अपघात कसा झाला याबाबत निष्कर्ष काढला आहे. त्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे . या अहवालाबाबत वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.तो अहवाल नेमका काय आहे आणि त्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण जाणून घेऊ.
ए ए आय बी चा अहवाल
ड्रीम लाइनर विमानाच्या अपघातामागील कारण शोधण्यासाठी पथक नेमले होते. या पथकाने 15 पानांचा तपासणी अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा बंद झाल्याने विमान अपघात झाला, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. दोन्ही इंजिनांचे इंधन नियंत्रण कंट्रोल स्वीच अवघ्या एका सेकंदात रन स्थितीतून कट ऑफ स्थितीत गेले. त्यामुळे विमान उड्डानाच्या काही सेकंदातच विमानाची उंची झपाट्याने कमी झाली आणि विमान कोसळले.
पायलट संघटना नाराज
ड्रीम लाइनर कंपनीने नेमलेल्या तपास पथकाने काढलेला निष्कर्ष पायलट संघटनेला मान्य नाही. विमान अपघाताचे कारण हे मुख्यतः पायलटला दोषी ठरवण्याचे आहे, असे या पथकाने निष्कर्ष काढल्यामुळे कंपनीने आपली बाजू सुरक्षित ठेवून पायलटना दोषी करण्याचा प्रयत्न केला असल्याचं पायलट संघटनेचे मत आहे. त्यामुळे पायलट संघटनेने याबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे.
विमान वाहतूक तज्ज्ञांना काय वाटते?
विमानात यांत्रिक समस्या किंवा वीज पुरवठा बंद झाल्यानंतर विमानाला इंधनपुरवठा करणाऱ्या स्वीचची स्थिती बदललेली असावी असा विमान वाहतूक तज्ज्ञांचा दावा आहे. या तज्ज्ञांनी पायलटना दोषी न देता विमानामध्येच काहीतरी बिघाड झालेला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केलेला आहे. विमानाचे सॉफ्टवेअर सुद्धा बिघडले असेल तर इंधनपुरवठा करणारे स्विच ऑफ झाले असतील असेही तज्ञांनी सांगितले.