क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स या मैदानावर अखेर भारत जिंकता जिंकता हरला. भारतीय खेळाडूंनी अगदी शर्थीची झुंज दिली;पण अखेर या लॉर्ड्सच्या परंपरेनुसार भारत पुन्हा एकदा लॉर्ड्सवर हरला.
मालिकेत इंग्लंडचा 2-1 ने विजय
भारतीय कर्णधार शुभमन गिल याने कर्णधाराची सूत्रे याच इंग्लंड दौऱ्यात स्वीकारली आहेत. कर्णधार म्हणून शुभमन गिल प्रथमच लॉर्ड्स मैदानावर खेळला; पण भारतीय क्रिकेटची परंपरा पाहिल्यास कोणत्याही कर्णधाराला या लॉर्ड्स मैदानावर अर्धशतक सुद्धा काढता आले नाही. त्याचबरोबर भारताला या लॉर्ड्स मैदानावर कधीही यश प्राप्त झाले नाही. लॉर्ड्स मैदानावर भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी दाखवली होती. पहिल्या डावात दोन्हीही संघांची समान धावसंख्या झाल्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडला अगदी 192 धावांमध्ये गुंडाळून विजयाचे लक्ष कमी ठेवले होते;पण भारतीय संघ अखेरच्या दिवशी कोसळला. रवींद्र जडेजाने एकतर्फी झुंज दिली; पण त्याची झुंज व्यर्थ ठरली. इंग्लंडने तिसरा कसोटी सामना जिंकल्यामुळे इंग्लंडची आघाडी 2-1 अशी झाली.