Shubanshu Shukla return to Earth-18 दिवस शून्य अंतराळात असणारा शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतणार

भारतीय हवाई दलाचा पायलट शुभांशू शुक्ला गेले 18 दिवस शून्य गुरुत्वात अंतराळात राहत होता. इस्रो आणि नासा यांच्या संयुक्त विद्यमाने अंतराळ प्रवास आयोजित केला होता. भारतातर्फे इस्रोने शुभांश शुक्ला याची निवड केली होती. 25 जून 2025 रोजी अंतराळयान पृथ्वीवरून अंतरिक्षाकडे झेपावले .15 जुलै 2025 रोजी हे अंतराळयान आणि शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतणार आहेत.

ऑक्झिओम-4 मोहीम 

अमेरिकेची नासा आणि भारताची इस्रो या दोन संस्थेच्या विद्यमाने ऑक्झिओम-4 ही मोहीम आयोजित केली होती. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले 18 दिवस भारतीय अंतराळवीर आणि अन्य तीन अंतराळवीर वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन करत होते. यामध्ये भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा समावेश होता .15 जुलै 2025 रोजी सर्व अंतराळवीरांसह शुभांशू शुक्ला यांचा प्रवास पृथ्वीच्या दिशेने सुरू झाला. या चौघांना घेऊन येणारे ड्रॅगन यान सोमवार दिनांक 14 जुलै 2025 रोजी सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी डिलॉकिंग झाले आणि ते पृथ्वीच्या दिशेने झेपावले. मंगळवारी दुपारी तीन वाजता ते कॅलिफोर्नियात उतरेल अशी आशा आहे.

अंतराळ स्थानक ते पृथ्वी: कसा असेल प्रवास? 

1 अंतराळ यान अंतराळ स्थानकापासून बाहेर पडले आणि पृथ्वीच्या दिशेने झेपावू लागले.

2 हे यान पृथ्वीच्या दिशेने झेपावत असताना त्याला वेगवेगळ्या प्रकारे दिशा बदलाव्या लागतील आणि त्याचबरोबर वेग ही बदलावा लागेल.

3 यान पृथ्वीवर येण्यासाठी मुख्य इंजिन सुरू होईल आणि पुढे सरकेल. त्याचबरोबर प्रवास सुरू होईल.

4 यानाचा मागील भाग यानापासून वेगळा होईल आणि प्रचंड उष्णतेने तो जळून नष्ट होईल.

5 अंतराळयान अंतराळ स्थानकापासून झेपावल्यानंतर शून्य गुरुत्वापासून हळूहळू पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल.

6 अंतराळ यान पृथ्वीपासून 5 किलोमीटर 600 मीटर अंतरावर असताना पॅराशुट उघडेल आणि यानाचा वेग हळूहळू कमी होईल.

7 हे ड्रॅगन यान कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनाऱ्यावर समुद्रात 15 जुलै 2025 रोजी दुपारी तीन वाजता उतरेल.

अंतराळयान उतरल्यावर पुढे काय? 

अंतराळयानातून अंतराळवीर उतरल्यानंतर त्यांना काही काळ विश्रांतीची गरज राहणार आहे. अंतराळ स्थानकावर जशी स्थिती होती त्या स्थितीतून बाहेर पडल्यानंतर पृथ्वीवरील गुरुत्वीय बलासी त्यांना सामना करावा लागतो. म्हणूनच त्यांना सात दिवस बाहेर राहावे लागेल. त्याला वेगळ्या वातावरणात ठेवावे लागेल. हळूहळू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलासी जुळून घेतल्यानंतर ते नॉर्मल होतील आणि मग जनमानसात मिसळतील.

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि त्याच्याबरोबर असलेले अन्य चार अंतराळवीर यांना परतीच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

Leave a comment