बिहार हे नेहमीच अशांत राज्य असले तरी अलीकडे बिहारमध्ये हत्यांचे प्रमाण वाढलेले आहे.त्यामुळे नितीशकुमार सरकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चांगलाच गंभीर झालेला आहे.
राज्य गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारी
बिहार राज्य गुन्हे ब्युरोने जी नवीन आकडेवारी दिलेली आहे त्या आकडेवारीनुसार बिहार राज्यात जानेवारी 2025 ते जून 2025 च्या दरम्यान दर महिन्याला सरासरी 229 हत्या बरोबरच 1376 हत्यांची प्रकरणी घडली आहेत. 2024 मध्ये हीच संख्या 2786 होती. 2023 मध्ये 2863 होती. बिहार हे हिंसक गुन्हे, पिस्तुलीशी संबंधित गुन्ह्यांसारखे गुन्हे करण्यात देशांमध्ये पहिल्या पाच राज्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. बिहारच्या या बिकट परिस्थितीचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर निश्चितच होईल अशी स्थिती निर्माण झालेली आहे.
बेरोजगारीची वाढती समस्या
संपूर्ण देशाबरोबरच बिहार राज्यामध्ये सुद्धा बेरोजगारीची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. बिहार राज्यामध्ये तरुण वयोगटातील अनेक तरुण बेरोजगार आहेत. त्यांना रोजगाराची संधीच उपलब्ध नाही. अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे तरुणांच्या मते मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. बिहार राज्य सरकार लोकांना रोजगार देण्यास असमर्थ ठरलेले आहे.