Panhala To Pawankhind campaign-पावनखिंड मोहीम की इव्हेंट?

दरवर्षी महाराष्ट्रात दरवर्षी 12 जुलै रोजी पन्हाळगड ते विशाळगड मोहीम असते . या मोहिमेलाच पावनखिंड मोहीम असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 जुलै 1660 रोजी पन्हाळगडावरून विशाळगडला निसटून जाण्यासाठी पलायन केले होते. वाटेत रणसंग्राम घडला आणि अनेक बाणदल सैन्य धारातीर्थी पडले. त्याची आठवण म्हणून दरवर्षी अनेक इतिहासप्रेमी लोक पन्हाळगड ते विशाळगड मोहीम काढतात; पण अलीकडे या मोहिमेचे स्वरूप बदलत चालले असून केवळ इव्हेंट असे स्वरूप होत चालले आहे.

पावनखिंडीतील रणसंग्राम

सिद्धी जोहरच्या घट्ट वेढ्यातून आपल्याला बाहेर पडणे अशक्य आहे, असे छत्रपती शिवरायांना जेव्हा जाणीव झाली तेव्हा त्यांनी एक युक्ती काढली आणि आपण शरण येत असल्याचे सिद्धी जोहरला कळवले. सिद्धी जोहर खूश झाला आणि तो बेसावध राहिला. वेढा सैल झाला आणि याचीच संधी साधून छत्रपती शिवरायांनी पन्हाळगडावरून विशाळगडाच्या दिशेने कूच केली. पण त्यासाठी त्यांना पहिला बळी शिवा काशिदचा द्यावा लागला.

शिवा काशीदचे योगदान आणि बलिदान

छत्रपती शिवरायांनी पन्हाळगडावरून विशाळगडाकडे निसटून जाण्यासाठी पहिला मोहरा शिवा काशीदला बनवला. शिवा काशिदला शिवरायांनी पूर्ण कल्पना दिली, की तुला शिवाजी म्हणून जायचे असले तरी तेथे तुझा मृत्यू अटळ आहे. तरी पण शिवा काशिद म्हणाला , “लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे”. या विचारानेच प्रेरित झालेल्या शिवा काशीदने आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मृत्यू पावनार या आनंदात समोरचा मृत्यू आनंदाने स्वीकारला आणि पालखीत बसून सिद्धी जोहारला भेटायला गेला. तेथे झालेल्या चकमकीत शिवा काशीदला सिद्धी जोहरने ठार केले. शिवा काशिदमुळे शिवरायांना विशाळगडाकडे कूच करण्यास वेळ मिळाला आणि शिवराय पावनखिंडीपर्यंत जाऊन पोहोचू शकले.

सिद्धी जोहरला चाहूल

आपल्याकडे नकली शिवाजी पाठवून शिवाजी महाराजांनी आपली फसवणूक केली असल्याचे सिद्धी जोहरला लक्षात आल्यावर त्याने तातडीने सिद्धी मसुदला विशाळगडाच्या दिशेने धाडले आणि शिवरायांवर हल्ला करण्यास हुकूम दिला सिद्धी मसूद वेगाने शिवरायांचा पाठलाग करू लागला. सिद्धी मसूदकडे घोडदळ होते. त्यामुळे त्याने शिवरायांच्या सैन्यांना पावनखिंडीत गाठले. शिवरायांना या गोष्टीची चाहूल लागताच त्यांनी आपल्या जवळील 600 मावळ्यांचे दोन भाग केले.एक तुकडी आपण स्वतः विशाळगडला घेऊन गेले. आणि दुसरी तुकडी वाटेत घोडखिंडीत ठेवली. येथेच बाणदल सैन्य आणि सिद्धी मसूद यांच्यात तुफान लढाई झाली.

600 मावळ्यांच्या बांदल सैन्यांचे नेतृत्व रायाजी बांधल या तरुण बांदल सेनापतीकडे होते. या लढाईत अनेक बांदल सैन्यांना वीरगती प्राप्त झाली.यामध्ये विसोजी काटे संभाजी जाधव, बाजीप्रभू देशपांडे यासारख्या 300 मावळ्यांना आपली जान कुर्बान करावी लागली .

जेव्हा शिवाजी महाराज विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले तेव्हा तेथे सुर्वे विशाळगडाची वाट अडवून बसले होते.शिवरायांनी 300 सैन्यांसह सुर्व्यांवर हल्ला केला आणि सुर्व्यांचा पराभव करून विशाळगडावर प्रवेश केला.

सध्याची पावनखिंड मोहीम एक इव्हेंट होतोय.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीची आणि बांदल सैन्याच्या पराक्रमाची साक्ष असलेली पावनखिंड. या पावनखिंडीच्या पराक्रमाची आठवण म्हणून अनेक इतिहास प्रेमी 1967 पासून पन्हाळगड ते विशाळगड मोहीम आखतात
दरवर्षी ही मोहीम 12 जुलै रोजी सुरू होते. अलीकडच्या पाच वर्षांचा आढावा घेतला असता अनेक तरुण लोक या मोहिमेत सामील होतात. वाटेत उलटबाजी करतात. त्यामुळे मोहिमेचे पावित्र्य कमी होत आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा आणि रणनीतीचा इतिहास जागरूक करणे हा तर या मोहिमे पाठीमागील हेतू होता;पण तो हेतूच आता दूर जात आहे आणि केवळ इव्हेंट शिल्लक राहत आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

Leave a comment