जगात भारी कोल्हापुरी असे म्हटले जाते ते कोल्हापुरी चपलाने सिद्ध करून दाखवले. कोल्हापुरी चपलाची पाहणी करण्यासाठी जगप्रसिद्ध पन्नास हजार कोटीची प्राडा कंपनी नुकतीच कोल्हापुरात आलेली आहे. कोल्हापुरी ब्रँड काय आहे हे समजून घेण्यासाठी ही कंपनी आलेली आहे.
जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल
कोल्हापुरी चपलाची ख्याती जगप्रसिद्ध आहे. या चपलांचे वैशिष्ट्य म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून हाताने बनवलेले हे चप्पल आरोग्यदायी असून हस्तकला म्हणून या चपला जगात सगळीकडे लोकप्रिय आहेत. जगात सगळीकडे कोल्हापुरी चपलांना मोठी मागणी आहे. याच चपलांचं निरीक्षण करण्यासाठी आणि हाताने बनवलेले हे चप्पल नेमके कसे बनवतात? हे जाणून घेण्यासाठी प्राडा कंपनी कोल्हापुरात गेले दोन दिवस मुक्काम ठोकून आहे.
प्राडा कंपनीला चप्पल भावले
पन्नास हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या कंपनीची तांत्रिक समिती मंगळवारी कोल्हापूर कारागिरांचे अस्सल गुणवत्तापूर्ण काम आकर्षक कलाकुसर रेखीव बांधणी आणि रुबाबदार कोल्हापुरी चप्पल पाहून इटलीच्या शिष्ट मंडळातील अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. एखाद्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे अधिकारी कोल्हापूर चप्पल पाहण्यास कोल्हापुरात येण्याची पहिलीच वेळ आहे.पुढील महिन्यात कंपनीचे वरिष्ठ अधिकारीही घेणार आहेत.