Milk Subsidy-आता दूध उत्पादकही शेतकरी समजले जातील, शेतकऱ्यांच्या सर्व सवलतींचा लाभ मिळणार..

दूध उत्पादकांना कृषीचा दर्जा देण्याचे शासनाने जाहीर केल्याने दूध उत्पादकांना आता शेतकरी समजले जाणार आहे. त्यामुळे त्यांना कर्ज, विमा इत्यादी योजनांचा लाभ होणार आहे. सोलर पंप, विद्युत पंप यासाठीही त्यांना आता सवलत मिळणार आहे.

दुग्ध व्यावसायिकांना कृषीचा दर्जा

महाराष्ट्रात ज्यांना शेती नाही असे अनेक लोक पर्यायी व्यवसाय करत असतात आणि त्यावर आपला गुजारा करत असतात. पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा त्याच प्रकारचा एक व्यवसाय आहे . म्हणूनच दुग्ध व्यावसायिकाला महाराष्ट्र शासनाने कृषीचा दर्जा देऊन त्यांना शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलती ,कर्ज, विमा याचा लाभ होणार असल्याचे बोलले जाते.

दुग्ध व्यवसायाला चालना मिळणार

महाराष्ट्र शासनाने दुग्ध व्यवसायिकाला शेतकरी समजण्याचा घेतलेला निर्णय हा दुग्ध व्यावसायिकाला फायदेशीर असल्याने इथून पुढे दुग्ध व्यावसायिकाला आपले दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी चालना मिळणार आहे. या योजनेचा दुग्ध व्यवसायिक निश्चितच फायदा घेऊन स्वतःच्या कुटुंबाचा विकास करतील आणि मोठ्या प्रमाणात दुग्ध उत्पादन करतील अशी आशा आहे.

Leave a comment