Almatti Dam-अलमट्टी धरण ओव्हरफ्लो -कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला धोक्याची घंटा

कृष्णा नदीवरील उत्तर कर्नाटकात असलेले सर्वात मोठे धरण म्हणजे अलमट्टी धरण होय. या धरणाचा पाणीसाठा आता धोक्याच्या पातळीकडे चालला आहे. 123 टीएमसी असलेल्या या अलमट्टी धरणात सध्या 119 टीएमसी पाणी आहे. अलमट्टीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कर्नाटक सरकारने सर्व गेट खुले करण्याचे आदेश दिले असून सध्या सर्वच्या सर्व 26 गेट खुले असून या गेटमधून 90 हजार क्युसेक पाणी वाहत आहे.

अलमट्टी धरण किती टीएमसीचे आहे?

कृष्णा नदीवरील सर्वात मोठे धरण म्हणून या अलमट्टी धरणाची ओळख आहे. हे धरण 123 टीएमसीचे आहे. कृष्णा नदीवर अनेक धरणे आहेत. कृष्णा नदीच्या अगदी उगमस्थानी वयगाव परिसरात धोम-बलकवडी धरण आहे. हे कृष्णा नदीवरील पहिले धरण आहे. या धरणात एक ते दीड टीएमसी पाणी साचते. येथून पुढे कृष्णा नदीवर अनेक धरणे बांधलेली आहेत; पण अलमट्टी धरण हे कृष्णा नदीवरील सर्वात मोठे आणि विस्तीर्ण धरण म्हणून याची ओळख आहे. या धरणाला लाल बहादूर शास्त्री असे नाव असले तरी ते अलमट्टी धरण या नावानेच ते ओळखले जाते.

अलमट्टी धरणातील 20 जुलै 2025 चा पाणीसाठा

20 जुलै 2025 रोजी अलमट्टी धरणात 518.26 मीटर पाणीसाठा म्हणजे 100 टीएमसी पाणीसाठा असल्याने 519.26 मीटर ही धोक्याची पाणी पातळी मानली जाते. त्यामुळेच कर्नाटक सरकारने धरण प्रशासनाला अलमट्टी धरणाचे सर्व गेट खुले करण्यास सांगितले आहे. संपूर्ण धरण भरेल त्यावेळी कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यातील अनेक गावांना फटका बसणार आहे.

अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरले तरी त्याचे बॅकवॉटर हे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यापर्यंत येऊ शकत नाही; पण जेव्हा धरण पूर्ण क्षमतेने भरते आणि वारणा,कृष्णा, कोयना या नद्या तुडुंब भरून वाहतात, तेव्हा कृष्णा नदीला फूग येते आणि पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना फटका बसतो. एवढेच नाही तर अनेक गावे, गावांची शेती पाण्याखाली जाते आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. म्हणूनच पावसाळ्यात अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरून चालत नाही.

Leave a comment