बांगला देशातील एका शाळेवर विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 20 जण ठार झाले. शिक्षकांसह पायलटचा यात मृत्यू झाला 171 जण जखमी झाले. या घटनेविषयी सविस्तर माहिती तिकडे पाहूया.
बांगलादेशातील विमान दुर्घटनेत 20 ठार
बांगलादेशातील हवाई दलाचे एक प्रशिक्षणार्थी विमान सोमवारी दुपारी उड्डाणानंतर काही वेळातच एका शाळेवर कोसळले. या घटनेत 20 जण ठार झाले, तर 171 जण जखमी झाले आहेत. हे विमान चीन निर्मित होते.
बांगला देशातील हवाई दलाचे एफ 7 बी जी आय हे विमान ढाकाच्या उत्तर भागात माइलस्टोन स्कूल अँड कॉलेज परिसरात कोसळले. अग्निशमन सेवा महासंचालक ब्रिगेडियर जनरल जाहेद कमाल यांनी सांगितले की या दुर्घटनेत 19 जण ठार झाले.बचाव पथकाला शाळेच्या परिसरात 19 मृतदेह आढळले आहेत.
विमान कोसळताच मोठा आवाज झाला आणि आग लागली
बांगला देशातील एका शाळेवर विमान कोसळताच प्रचंड आवाज झाला आणि लगेच सगळीकडे आग भडकली. सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजी दुपारी एक वाजून सहा मिनिटांनी उड्डाण झालेले विमान काही क्षणातच शाळा महाविद्यालयाच्या परिसरात कोसळले. सुदैवाने हे विमान ज्या ठिकाणी विद्यार्थी बसलेले होते त्या इमारतीवर कोसळले नाही. तरीसुद्धा या दुर्घटनेत एक शिक्षक ठार झाले आहेत.