Lose Weight-वजन कमी करताय? जीवावर बेतेल, जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

योग्य वेळी योग्य ती काळजी न घेतल्यामुळे काही माणसांचे वजन अवाजवी वाढलेले असते. हे वजन कमी करण्यासाठी काही वेळेला अघोरी उपायांचा वापर केला जातो. आणि त्यामुळे अशा पद्धतीने वजन कमी केल्यास जीव गमावण्याचा सुद्धा धोका असतो. म्हणूनच वजन कमी करताय? जीवावर बेतेल!असा सल्ला देण्याचा हा प्रयत्न आहे. तर जाणून घेऊया आपण याबद्दल सविस्तर माहिती.

डौलदार शरीर सर्वांनाच हवे असते. पण 

प्रत्येकालाच आपले शरीरयष्टी चांगली असावी,आपल्या शरीर डौलदार असावे असे वाटते: पण केवळ वाटून काही उपयोग नाही. त्यासाठी आपणच योग्य पावले उचलली पाहिजेत. तरच आपण आपले शरीर डौलदार आणि आकर्षक बनवू शकतो.

वजन कमी करण्याचा अघोरी उपाय जीवावर बेतला.

उत्तर प्रदेशातील मेरठ या ठिकाणी एका 55 वर्षांच्या महिलेला वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया चांगलीच भोवली. या शस्त्रक्रियेत तिला प्राण गमवावा लागला. रजनी गुप्ता ही 55 वर्षांची महिला होती.तिचे वजन खूप वाढले होते. ते जवळजवळ 123 किलो होते. तिला डॉक्टरांनी 30 किलो वजन शस्त्रक्रियेने कमी करून देतो असा सल्ला दिला होता. त्यामुळे ती शस्त्रक्रिया करून घेण्यास तयार झाली होती. ही शस्त्रक्रिया करत असताना चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया झाल्याने तिला संसर्ग झाला आणि त्यातच ती मृत्यू झाली. तर अशा प्रकारे शस्त्रक्रिया करून कोणीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नये. शस्त्रक्रिया करून वजन कमी करणे हा एक अघोरी उपाय आहे त्यामुळे अशा पद्धतीने वजन कमी करणे चुकीचे आहे.

वजन कमी करण्याची औषधे घेणे कितपत योग्य?

वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे उपाय करत असतात. काही लोक ऑनलाईन औषध घेऊन किंवा बाजारात मिळणारी औषधे घेऊन वजन कमी करण्याचा किंवा वजन वाढवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांच्या शिवाय घेतलेल्या औषधांचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो किंवा गंभीर आजार होऊ शकतो. मार्केटमधील अशा पद्धतीची औषधे खाऊन कॅन्सरसारखा भयानक आजारही होऊ शकतो. म्हणून वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या गोळ्या किंवा औषधे घेऊ नयेत.

वजन कमी करण्यासाठी काय करावे? 

आपण वेळीच काळजी घेतली नसल्यामुळे अनियंत्रित वजन होते. पण हे वजन कमी कसे करायचे? हा गंभीर प्रश्न होऊन बसतो. तरीसुद्धा आपण आपले वजन नियंत्रित ठेवू शकतो आणि आपले शरीर सुडौल बनवू शकतो.फक्त त्यासाठी आपण प्रचंड आत्मविश्वासाने खालील गोष्टी करणे आवश्यक आहे.

1 दररोज आणि नियमित पाच ते सात किलोमीटर चालणे आवश्यक आहे. रमतगमत चालण्यापेक्षा हळूहळू चालण्याचा वेग वाढवला तर त्याचा फायदा होऊन वजन कमी होऊ शकते.

2 नियमित व्यायाम करणे हा एक वजन कमी करण्यावर उत्तम उपाय मानला जातो. व्यायाम करताना किमान दीड ते दोन तास आपल्या शरीराचा सर्वांगीण व्यायाम होईल असा व्यायाम निवडावा. सूर्यनमस्कार, योगासने इत्यादी व्यायामांचा नियमित सराव घालावा.

3 पाच सूर्यनमस्कारापासून सुरुवात करावी आणि हळूहळू सूर्यनमस्कार वाढवावेत.तुम्ही नियमित 50 सूर्यनमस्कार किंवा त्याहीपेक्षा जास्त सूर्यनमस्कार घालत असाल तर तुमचे वजन निश्चित नियंत्रित राहील. योग्य प्रमाणात राहील आणि तुमचे शरीरही सुडौल बनेल. एवढेच नव्हे तर तुमच्या शरीराचा सर्वांगीण व्यायाम उत्तम प्रकारे होईल. त्यामुळे सूर्यनमस्कार हा वजन कमी करण्याचा प्रभावी उपाय आहे असे म्हटले जाते.

4 आहार हा सुद्धा वजनावर परिणाम करणारा घटक आहे. आपला आहार योग्य आणि प्रमाणबद्ध असल्यास आपले वजनही नियंत्रित राहते. सकाळचा नाश्टा हा फलाहार स्वरूपात असला पाहिजे. दुपारचे जेवण आपल्याला हवे तेवढे योग्य प्रमाणात घेतले पाहिजे. सायंकाळी कमीत कमी सात ते साडेसात वाजता आपण हलके हलकेच जेवण केले पाहिजे. अध्येमध्ये कोणतेही पदार्थ खाऊ नयेत.आपल्या जेवणाच्या आणि नाश्टा घेण्याच्या वेळा जास्तीत जास्त काटेकोरपणे पाळल्यास आणि आहार योग्य पद्धतीने घेतल्यास आपण वजन नियंत्रित ठेवून यशस्वी होतो.

5 आहारात गोडधोड पदार्थ कमी करावेत. साखर किंवा मिठाईयुक्त पदार्थ आहारात अधिक प्रमाणात असल्यास वजन वाढतच राहते. त्यामुळे अशा पदार्थांपासून दूर राहावे.

6 सायकल चालवणे हा सुद्धा वजन कमी वजन करण्यावर उत्तम उपाय मानला जातो. सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी नियमित पाच ते सात किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त किलोमीटर सायकल चालवल्यास आपल्या शरीराचा चांगला व्यायाम होतो.शरीरात मेद युक्त पदार्थाचे ज्वलन होते आणि आपल्या वजन कमी करण्यास मदत होते.

7 दुपारच्या वेळी झोपण्याची अनेकांना सवय असते तुम्ही जर नेहमीच दुपारी झोपत असाल तर निश्चितच तुमचे वजन वाढते म्हणून दुपारच्या वेळी झोपणे टाळावे.

Leave a comment