मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील बारा आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. उच्च न्यायालयाचा निकाल. मुंबईतील पश्चिम रेल्वे उपनगरातील लोकल गाड्यांमध्ये 11 जुलै 2006 रोजी अवघ्या 11 मिनिटात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या हल्ल्यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. 800 हून अधिक जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाच्या पाठीमागे हात असल्याचा संशयीत आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे निर्दोष लोकांना न्याय मिळाल्याचे आरोप ठेवलेल्या व्यक्तींच्या वकिलांनी म्हटले आहे. काय आहे नेमका खटला जाणून घेऊया अधिक माहिती.
11 जुलै 2006 चा बॉम्बस्फोट: मुंबई हादरली.
11 जुलै 2006 रोजी मुंबई उपनगरातील लोकल गाड्यांमध्ये ११ मिनिटात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटामध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर 800 हून अधिक लोक जखमी झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली होती. यावेळी अनेक जणांना धरपकड करून साखळी बॉम्बस्फोट केलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत 12 आरोपी सध्या तुरुंगात होते. 19 वर्षांनी हा उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वांनाच अचंबित करणारा ठरला. कारण त्यामुळे 12 निर्दोष लोकांना मुक्तता मिळाली.
निर्दोष सुटलेले आरोपी कोण आहेत?
तन्वीर अन्सारी, मोहम्मद माजिद, मोहम्मद अन्सारी, शेख मोहम्मद, अली आलम शेख, महंमद साजिद, मर्गुब अन्सारी, मुजामिल अंतुर रेहमान शेख, सोहेल मेहमूद शेख, जमीर अहमद इत्यादी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिलेली होती.पण उच्च न्यायालयाने या सर्वांना निर्दोष ठरवले आहे.
तपास यंत्रणा,सरकार, वकील ठरले अपयशी
मुंबई पोलिसांनी आरोपींच्या वेळोवेळी घरी जाऊन झाडाझडती केली होती . त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला होता. त्याचबरोबर आरोपींनाही डांबून ठेवून मानसिक आणि शारीरिक त्रास केला होता. अर्थात दोषी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा असते; पण निर्दोष लोकांचा विनाकारण छळ करणे, त्यांना शारीरिक त्रास देणे किंवा मानसिक त्रास देणे चुकीचे आहे. मुंबई बॉम्ब स्फोट हल्ल्यात ज्यांना पोलिसांनी, तपास यंत्रणेने, वकिलांनी आणि राज्य सरकारने गुन्हेगार ठरवले त्यांनाच उच्च न्यायालयाने निर्दोष सोडल्यामुळे संपूर्ण तपास यंत्रणेला, पोलिसांना,वकिलांना अपयश आल्याचे म्हटले जाते. सबळ पुरावे मिळाले नसल्यामुळे सदर 12 आरोपी निर्दोष सुटले आहेत.
आरोपींच्या सुटकेसाठी हायकोर्टाला लागली दहा वर्षे
2006 सली मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मकोका न्यायालयाने ठरवलेल्या बारा आरोपींना फाशीची शिक्षा दिली होती. या निकालाविरुद्ध आरोपी 2015 सालीच उच्च न्यायालयात गेले होते.उच्च न्यायालयात 2015 सालापासून हा खटला चालला आणि सुनावणी होण्यास जुलै 2024 हे साल उघडले. त्यानंतर पूर्ण निकाल लागण्यास 21 जुलै 2025 उजाडले. म्हणजे जवळजवळ दहा वर्षांनी आरोपींना निर्दोष ठरवण्यास किंवा त्यांची सुटका होण्यास वेळ लागला.
12 आरोपी निर्दोष कसे सुटले?
मकोका न्यायालयाने दोषी ठरवलेल्या 12 आरोपींना उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली. याचे प्रमुख कारण म्हणजे साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीमध्ये विश्वासार्हता नव्हती. सरकारी वकीलांनी आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवली होती; पण या साक्षीदारांची उलट तपासणी करता त्यांच्या साक्षीमध्ये विश्वासार्हताच आढळली नाही. हे मुख्य कारण हे आरोपी निर्दोष सुटण्यामागे आहे.
2 कबुली जबाब सुद्धा विश्वासनीय
आरोपींनी दिलेले कबुली जबाब हे अवैध आणि अविश्वासनीय असल्याचे म्हटले आहे. कबुली जबाब घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पूर्व परवानगी घेण्यात आलेली नाही. शिवाय कबुली जबाब घेण्यापूर्वी आणि तो घेतल्यानंतर अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या पत्रव्यवहारांमध्ये विसंगती आढळलेली आहे. या आणि अनेक कारणांमुळे उच्च न्यायालयाने बारा आरोपींना निर्दोष सोडले आहे.
आम्ही 19 वर्षे मरणयातना भोगल्या : 12 आरोपी
आम्ही पूर्णतः निर्दोष असून आम्हाला विनाकारण या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात गुंतवले आहे. 2006 पासून 19 वर्षे तुरुंगात राहून आम्ही मरणयातना भोगल्याचे 12 आरोपींचे म्हणणे आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर आरोपींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आमच्याच बाजूने न्याय लागेल असे आरोपींनी म्हटले आहे.