जुलै 2025 च्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत भारत पाक युद्ध थांबवणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ काला है .अशा शब्दात संसदेत आपले मत मांडले. विरोधी पक्षाने या गोष्टीवर मोदी सरकारला घेराव घातला. मोदी ट्रंपला का भितात? याबद्दलही संसदेत आवाज उठला.
ट्रम्प यांनी 50 वेळा भारत पाक युद्ध थांबवल्याचा उल्लेख केला
पहेलगाम हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर भारताने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. अशावेळी ट्रम्प यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा करून सीझ फायर केले. नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष यांनी सीझ फायरची घोषणा करण्यापूर्वीच ट्रम्प यांनी सीझ फायरची घोषणा केली होती; पण त्यावर दोन्हीही देशाच्या प्रमुखांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर वारंवार ट्रम्प यांनी भारत-पाक युद्ध मी थांबवले. त्यामुळे टॅरिफ करार बाबतीत तुम्ही माझे ऐकायचे अशा प्रकारची तर दोन्ही देशांना ट्रम्प यांची धमकी तर नाही ना ?असेही वाटते.
बांगलादेश पाकिस्तान संघर्षात 1971 साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी उडी घेतली होती.त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन पाकिस्तानला पराभूत केले होते. त्यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इंदिरा गांधी यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून दडपण आणले होते; पण आमच्या दोन देशातील संघर्षात बाकीच्या कुणीही भाग घ्यायचा नाही असा ठणठणीत इशारा संपूर्ण जगाला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यावेळी दिला होता. यावेळी भारतीय लष्कराने चांगल्या पद्धतीने आपली कामगिरी करत असताना सुद्धा अचानक सीझ फायर झाल्याने मोदी सरकार व संपूर्ण भारतात टीका झाली. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी संसदेत विषय काढला होता.
सीझ फायर संदर्भात राहुल गांधी यांनी सरकारला वारंवार घेरले
सीझ फायर संदर्भात राहुल गांधी यांनी सरकारला वारंवार घेरले आहे. सरकारला अनेक वेळा मीडियाद्वारे प्रश्न विचारले आहेत; पण नरेंद्र मोदी यांनी यावर नेहमीप्रमाणेच मौन पाळले आहे. जुलै 2025 च्या पावसाळी अधिवेशनात तिसऱ्या दिवशीही विरोधी पक्षांच्या आक्रमक भूमिकेमुळे संसदेत गोंधळ निर्माण झाला. राहुल गांधी यांनी तिसऱ्या दिवशी सीझ फायर संदर्भात खडे बोल सरकारला सुनावले. भारत पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? अशा शब्दात त्यांनी संसदेत आपले मत व्यक्त केले आणि मोदींवर हल्ला केला.