Cervical cancer-स्त्रियांसाठी धोकादायक कॅन्सर-गर्भाशयमुखाचा कॅन्सर जाणून घ्या.

आपल्या भारत देशात दरवर्षी गर्भाशय मुखाच्या कॅन्सरमुळे 75 हजार महिलांचा मृत्यू होतो. हा आकडा विचारत घेता गर्भाशयाचा कॅन्सर किती जटिल समस्या आहे हे लक्षात येईल. त्यामुळे हा कॅन्सर नष्ट होण्यासाठी लसीकरण करण्याबाबत जागृती आवश्यक आहे.

गर्भाशय मुखाच्या कॅन्सर ची लक्षणे

1 ओटीपोटात दुखणे किंवा पोटात दुखणे, पोट फुगणे, पोट जास्त भरल्यासारखे वाटणे, हे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात.

2 योनीतून रक्तस्राव होणे हे सुद्धा गर्भाशयाच्या खालच्या कॅन्सरचे लक्षण आहे. स्त्रियांच्या नियमित मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव होतो. हे नेहमीच असते;      पण मासिक पाळी नसतानाही रक्तस्राव होत असल्यास ते कॅन्सरचे लक्षण असू शकते.

3 आतड्याच्या सवयीत बदल होणे बद्धकोष्ठता निर्माण होणे, वारंवार अतिसाराचे लक्षण दिसणे ही सर्व गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची प्राथमिक लक्षणे आहेत.

4 गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असल्यास पोटाचा आकार वाढतो.ओटीपोटीत सूज येते.

5 वारंवार लघवीला होणे ही सुद्धा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर ची लक्षणे आहेत.

गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची कारणे 

1.स्त्रियांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त झाले असता किंवा रजोनिवृत्तीच्या वेळी निर्माण होणाऱ्या समस्येमुळे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची समस्या निर्माण होते.

2.लठ्ठपणा-वयाच्या चाळीशी नंतर स्त्रियांचे वजन वाढत जाते आणि लठ्ठपणा अवाजवी होतो. त्यामुळे सुद्धा गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो.

3.मासिक पाळीच्या वेळी स्वच्छता न पाळणे हे गर्भाशय मुखाच्या कॅन्सर चे मुख्य लक्षण मानले जाते. रक्तस्राव रोखण्यासाठी मासिक पाळीच्या वेळी अनेक स्त्रिया जुने कापड किंवा फडके वापरतात. अस्वच्छ कापड वापरल्यामुळे किंवा फडके वापरल्यामुळे जंतूंचा प्रादुर्भाव होतो आणि अशावेळी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात.

लसीकरणासाठी जागृतीची आवश्यकता

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ नये म्हणून सध्या लसीचा शोध लागलेला आहे.या लसीकरणासाठी स्त्रियांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. लसीकरण मोहीमेचा वेग वाढवणे आवश्यक आहे. खेड्यापाड्यातील स्त्रिया, झोपडपट्टीतील स्त्रिया, आदिवासी भागातील स्त्रिया, कामगार स्त्रिया यांच्यापर्यंत लसीकरणाची मोहीम पोहोचत नाही.अशा ठिकाणी प्रत्यक्ष परिचारिका आशा सेविका यांनी प्रत्यक्ष जाऊन लसीकरणाबाबत स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. 100% लसीकरण झाल्यास गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्यापासून स्त्रियांचे रक्षण होईल आणि दरवर्षी देशातील 75 हजार महिलांचा जीव वाचेल.

Leave a comment