The Biggest Planet Ever Discovered-अंतरिक्षात गुरुच्या दहा पट मोठा असलेला ग्रह सापडला!

आपले अंतरिक्ष विशाल आणि अथांग आहे. या अंतरीक्षाची व्याप्ती किती मोठी आहे हे कोणत्याही गणिती सूत्रात सांगता येत नाही. असाच एक अंतरिक्षात एका तरुण ताऱ्याभोवती फिरत असलेला महाकाय ग्रह खगोलशास्त्रज्ञांना सापडला आहे. हा ग्रह गुरुच्या दहा पट मोठा आहे.या ग्रहाबद्दल अधिक संशोधन भविष्यकाळात नक्कीच आहे.

हा महाकाय ग्रह पृथ्वीपासून किती दूर आहे? 

गुरुच्या दहापट मोठा असलेला हा ग्रह आपल्या सूर्याभोवती फिरत नसून तो दुसऱ्या एका तरुण ताऱ्याभोवती फिरतो आहे. हा प्रचंड ग्रह पृथ्वीपासून 280 प्रकाश वर्ष दूर आहे. याचा अर्थ असा की पृथ्वीपासून या ताऱ्यापर्यंत प्रकाश जायला 280 प्रकाश वर्ष लागतील. म्हणजे तो किती दूर आहे याची कल्पना करा. या तार्‍याचा जन्म सुमारे 1.3 कोटी वर्षांपूर्वी झाला असल्याचे तार्‍याच्या प्राथमिक निरीक्षणांमधून खगोलशास्त्रज्ञांना आढळलेले आहे. या ताऱ्याभोवतालची रचना कशा प्रकारची आहे याची निश्चित माहिती अद्याप मिळालेली नसली तरी भविष्यात निश्चितच या ताऱ्याचा संपूर्ण अभ्यास खगोलीय अभ्यासकांना मिळेल अशी आशा आहे.

खगोलीय शास्त्रज्ञांच्या मते सूर्यमालेच्या बाहेरील कक्षातील ग्रह शोधून काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या संशोधनाला खूप महत्त्व आहे.

ग्रह कसे तयार होतात? 

ग्रह हे प्रोटोप्लॅनेटरी डिस्कमध्ये कोर ॲक्रिशन नावाच्या प्रक्रियेद्वारे तयार होतात. यात मोठे कण गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र चिकटतात आणि त्यातून प्लॅनेटेसिमल्स, लघुग्रह आणि अखेरीस ग्रह तयार होतात. या प्रक्रियेत प्रोटोप्लॅनेटरी डिस्कमधील पदार्थ ग्रहांमध्ये सामावले जातात. तेव्हा तयार झालेले ग्रह त्या डिस्कमध्ये मार्ग तयार करतात. जे एखाद्या विनाइल रेकॉर्डवरील खोबणीसारखे दिसतात.

Leave a comment